आशीष नेहरा आज खेळणार शेवटचा सामना

भारताने न्यूझिलंडविरोधातील एकदिवसीय सामन्यांच्या सिरीजमध्ये विजय मिळवल्यानंतर आता दोन्ही संघ टी २० सिरीजसाठी सज्ज झाले आहेत.  

Updated: Nov 1, 2017, 08:12 AM IST
आशीष नेहरा आज खेळणार शेवटचा सामना  title=

दिल्ली : भारताने न्यूझिलंडविरोधातील एकदिवसीय सामन्यांच्या सिरीजमध्ये विजय मिळवल्यानंतर आता दोन्ही संघ टी २० सिरीजसाठी सज्ज झाले आहेत.  

फिरोझशाह कोटला स्टेडीयमवर आज भारत आणि न्यूझीलंडविरोधात पहिली टी-20 मॅच रंगणार आहे.. ही मॅच आशीष नेहरासाठी विशेष असेल... कारण नेहराचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असणर आहे.. 

न्यूझीलंडविरुद्धच्या फिरोझशाह कोटला मैदानात होणारी टी-20 लढत माझ्यासाठी शेवटची असेल असं वक्तव्य नेहरानं काही दिवसांपूर्वी केलं होतं.. त्यामुळे नेहराच्या कामगिरीवर सा-यांचं लक्ष लागलंय.. आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये भारताला एकदाही विजय मिळवता आलेला नाही.  त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी भारत सज्ज झालाय..