अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खान हा पाठीच्या समस्येने त्रस्त आहे. मागील वर्षीच त्याने याची सर्जरी केली होती, या दुखापतीमुळे आता राशिद खान भविष्यात टेस्ट फॉरमॅट खेळणार नसल्याचं कळतंय. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की टीम मॅनेजमेंटने राशिदच्या पाठीची समस्या लक्षात घेऊन टेस्ट क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा परस्पर संमतीने निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 9 सप्टेंबर पासून एक सामन्याची टेस्ट सिरीज खेळवण्यात येणार आहे. मात्र या टेस्ट सामन्यासाठी राशिद खानला संघात स्थान देण्यात आले नाही. भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर राशिद खानने पाठीची सर्जरी केली होती, यानंतर तो पुढील चार महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहिला होता. मग जुलै महिन्यात झालेल्या टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये त्याने पुन्हा कमबॅक केले आणि या स्पर्धेत कॅप्टन म्हणून अफगाणिस्तानचे नेतृत्व सुद्धा केले. त्याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानची टीम सेमी फायनलमध्ये पोहोचू शकली.
हेही वाचा : एक दोन नाही तर क्रिकेटमध्ये तब्बल 11 प्रकारे आउट होऊ शकतो बॅट्समन, तुम्हाला माहितीयेत का नियम?
25 वर्षीय राशिद खान याने काबुलमध्ये शपागीजा टी 20 लीगमध्ये तीन सामने खेळले यात त्याने एकूण 6 विकेट्स सुद्धा घेतले. शस्त्रक्रियेनंतर हळूहळू कामाचा ताण वाढवण्याची राशिदची योजना होती. पुढील सहा महिने ते वर्षभर टेस्ट क्रिकेट सारख्या लांब फॉरमॅटमध्ये न खेळणे हाही योजनेचा भाग होता. टेस्ट क्रिकेटमध्ये तो एका टोकाकडून गोलंदाजी करावी लागेल आणि त्यासाठी तो पूर्णतः तयार नाही. पुढील महिन्यात अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सिरीज खेळणार आहे. तेव्हा या सिरीजसाठी राशिद उपलब्ध होऊ शकेल.
हेही वाचा : 'मुलगा नेता झाला नाही पण नेत्यांपेक्षा पॉवरफुल...' जय शाह ICC चेअरमन झाल्यावर ममता बॅनर्जींची पोस्ट
राशिद खानने अफगाणिस्तान विरुद्ध पाच टेस्ट, 103 वनडे आणि 93 टी 20 सामने खेळेल आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेत झालेल्या ‘द हंड्रेड’ दरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. अफगानिस्तानमधील वातावरण काही वर्षांपासून सुरक्षेच्या दृष्टीने चांगलं नसल्यामुळे अफगाणिस्तानची टीम टीम भारतातील ग्रेटर नोएडा येथे सराव करत आहे.