महिला क्रिकेटर्ससाठी अक्षयचा मेसेज

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल सुरु आहे. इतर क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारही या मॅचसाठी उत्सुक आहे. 

Updated: Jul 23, 2017, 06:05 PM IST
महिला क्रिकेटर्ससाठी अक्षयचा मेसेज title=

मुंबई : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल सुरु आहे. इतर क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारही या मॅचसाठी उत्सुक आहे. 

त्याने काही मिनिटांपूर्वीच एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केलाय. महिलांचा सामना याचि देहि याचि डोळा पाहण्यासाठी तो स्टेडियमवर जातोय. अक्षयने या व्हिडीओत म्हटलेय की, कधी एकदा लॉर्ड्सच्या मैदानावर पोहोचतोय असे झालेय. 

तब्बल १२ वर्षांनी भारतीय महिला संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचलाय. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली. आजही भारतीय संघ चांगली कामगिरी करुन लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास घडवेला असा विश्वास आहे.