Rohit Sharma: हे सर्व बकवास...! वर्ल्डकप टीम सिलेक्शनवरून संतापला रोहित शर्मा

Rohit Sharma: टी-20 वर्ल्डकपमध्ये कोणत्या खेळाडूंची वर्णी लागणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. अशावेळी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये ओपनिंग करणार. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 18, 2024, 12:17 PM IST
Rohit Sharma: हे सर्व बकवास...! वर्ल्डकप टीम सिलेक्शनवरून संतापला रोहित शर्मा title=

Rohit Sharma: सध्या आयपीएल सुरु असून त्यानंतर लगेच आयसीसी टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. जून महिन्यापासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार असून 5 जून रोजी टीम इंडियाचा पहिला सामना रंगणार आहे. आगामी काळात वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. दरम्यान यासाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय निवड समितीची बैठक या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी होऊ शक्यता वर्तवण्यात येतेय.

रोहित शर्माने मिडीया रिपोर्ट्सचं केलं खंडन

टी-20 वर्ल्डकपमध्ये कोणत्या खेळाडूंची वर्णी लागणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. अशावेळी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये ओपनिंग करणार. दरम्यान याबाबत रोहित शर्माने अजित आगरकर आणि हेड कोच राहुल द्रविड यांच्यासोबत चर्चा केली आहे. मात्र रोहित शर्माने या मीडिया रिपोर्ट्सचं खंडन केलं आहे. 

रोहितने या सर्व बातम्यांना बकलास म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज ॲडम गिलख्रिस्ट आणि माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉन यांच्याशी बोलताना रोहित म्हणाला, 'मी कोणालाही भेटलो नाही. अजित आगरकर सध्या दुबईत कुठेतरी आहे. ते गोल्फ खेळत आहेत. तर दुसरीकडे राहुल द्रविड त्यांच्या मुलाचा खेळ पाहत आहेत. आणि मी स्वतः मुंबईत होतो.

रोहित शर्मा म्हणाला की, 'खरं सांगायचं तर आमची भेट झाली नाही. आजकाल जोपर्यंत मी, राहुल, अजित किंवा BCCI मधील कोणीही कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत नाही, तोपर्यंत हे सर्व बकवास आहे. 

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने रोहित शर्माला विचारले की, असा कोणी खेळाडू आहे का, ज्याला तो केवळ मनोरंजनासाठी संघात ठेवू इच्छितो. यावर रोहित हसला आणि त्याने ऋषभ पंतचं नाव घेतलं. रोहितच्या म्हणण्यानुसार, खरं सांगायचं झालं तर हे सर्व लोकं क्रेझी आहेत. जर टीममध्ये मला कोणी हसवत असेल तर तो ऋषभ पंत आहे. मी त्याला लहान असल्यापासून पाहत आलोय. त्याच्या अपघातामुळे तो वर्षभर खेळू शकला नाही. त्यावेळी मी खूप निराश झालो होतो. तो खूपच विनोदी स्वभावाचा आहे. तो स्टंपमागे ज्या प्रकारची कामे करतो त्या गोष्टी तुम्हाला हसण्यास भाग पाडतात.

टी-20 वर्ल्डकप ग्रुप:

  • अ ग्रुप- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
  • ब ग्रुप- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
  • क ग्रुप- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
  • ड ग्रुप- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ