इंग्लंडचा महान ऑलराउंडर एड्रयू फ्लिंटॉफने आपल्या करिअरमध्ये कमालीची कामगिरी करून इंग्लंडच्या संघाला अनेकदा विजय मिळवुन दिलाय. फ्लिंटॉफने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या कौशल्याने लोकांना सतत प्रभावी केले आहे. फ्लिंटॉफने आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात 1998 साली केली तर, 2009 मध्ये त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. पण आता एंड्रयू फ्लिंटॉफचा लहान मुलगा रॉकी फ्लिंटॉफचा फलंदाजी करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. अनेक क्रिकेटतज्ञ आणि क्रिकेट फॅन्स यांचे मानने आहे की, रॉकी फ्लिंटॉफच्या फलंदाजीत खूद एंड्रयू फ्लिंटॉफची झलक दिसते.
एंड्रयू फ्लिंटॉफचा मुलगा, रॉकी हा लँकशायर सेकंड 11 संघाकडून खेळतो. त्याने नुकताच लँकशायर सेकंड 11 आणि डरहम सेकंड 11 यांच्यात झालेल्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. या सामन्यात रॉकी फ्लिंटॉफने 3 कमालीचे षटकार लगावत आपलं अर्धशतकसुद्धा पूर्ण केलं होतं. या प्रदर्शनाने सारे क्रिकेट फॅन्स आणि क्रिकेटतज्ञांना आश्चर्याचा झटका दिला होता, कारण रॉकीच्या फलंदाजीत चक्क हुबेहुब आपले वडिल एंड्रयू फ्लिंटॉफची झलक दिसत होती. आपल्या अर्धशतकीय खेळीत रॉकीने पूल शॉटवर लगावलेल्या षटकाराची चर्चा तर साऱ्या इंटरनेटवर होत आहे, कारण बऱ्याच लोकांना या शॉटमध्ये एंड्रयू फ्लिंटॉफची सावली झळकत आहे.
Rocky Flintoff with sixes on his way to an unbeaten half-century for the 2nd XI!
Our 2nd XI clash with Durham ends in a draw as the rain interrupts once again.
Scorecard https://t.co/WieghotbNI
#RedRoseTogether pic.twitter.com/Rrc2SWUB9t
Lancashire Cricket (@lancscricket) April 18, 2024
रॉकी फ्लिंटॉफने लँकशायर सेकंड 11 आणि डरहम सेकंड 11 च्या सामन्यात, लँकशायरच्या पहिल्या इनिंगमध्ये 78 बॉलमध्ये 50 धावांची नाबाद खेळी खेळली आहे. या खेळीत रॉकीने एकूण 2 चौके आणि 3 षटकार ठोकले होते. योगायोगाने रॉकी फ्लिंटॉफचा मोठा भाऊ कोरी फ्लिंटॉफ पण लँकशायर सेकंड 11 संघाकडूनचं खेळतो. कोरी या सामन्यात 12 बॉलमध्ये 9 रनच बनवु शकला. तर आता फ्लिंटॉफ भावंडावर आता संपूर्ण क्रिकेट जगाचे लक्ष लागलेले आहे. बघण्यायोग्य गोष्ट असणार की, आपले वडिल एंड्रयू फ्लिंटॉफसारखं नाव हे दोघं भावंडे बनवु शकता की नाही?