Asia Cup : रोहितची अवघ्या काही महिन्यात ऐतिहासिक कामगिरी, कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड ब्रेक

Asia Cup 2022 : रोहित शर्माने (Rohit Sharma) विराट कोहलीचा (Virat Kohli) टी 20 सामने जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला.

Updated: Sep 1, 2022, 06:37 PM IST
Asia Cup : रोहितची अवघ्या काही महिन्यात ऐतिहासिक कामगिरी, कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड ब्रेक title=

मुंबई : आशिया कपमध्ये  (Asia Cup 2022) टीम इंडियाने बुधवारी हाँगकाँगवर (IND vs HKG) 40 धावांनी शानदार विजय मिळवला.  या विजयासह टीम इंडियाने सुपर 4 राउंडमध्ये धडक मारली. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) हा विजय फार खास ठरला. रोहितने या विजयासह मोठा विक्रम आपल्या नावे केला. रोहितने विराट कोहलीचा (Virat Kohli) टी 20 सामने जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला. यासह रोहित टीम इंडियाच्या टी 20 क्रिकेटमधील इतिहासातील दुसरा यशस्वी कर्णधार ठरला. (asia cup 2022 ind vs hkg team india captain rohit sharma surpassed to virat kohli and become 2nd most succesful captain in  t20i format) 

विराटने 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर रोहितने सर्व सूत्रं हाती घेतली होती. रोहितने आतापर्यंत 37 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय. रोहितने या 37 पैकी 31 सामन्यात टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात विजय मिळवून दिलाय.

तर विराटने 50 टी 20 मॅचेसमध्ये टीम इंडियाची कॅप्टन्सी केलीय. त्यापैकी 30 मॅचमध्ये विराटने प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलंय. तर महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा आतापर्यंतचा टी 20 यशस्वी कर्णधार आहे. धोनीने 72 पैकी 41 सामन्यात संघाला विजयी केलंय.