आशिया कपसाठी Team Indiaचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना संधी

आशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर  केला आहे. 

Updated: Aug 8, 2022, 09:55 PM IST
आशिया कपसाठी Team Indiaचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना संधी  title=

मुंबई : आशिया कप (Asia Cup)  स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) संघ जाहीर  केला आहे. या संघात रोहित शर्माकडेच कर्णधारपद असणार असून उपकर्णधार पद  के एल राहूलला देण्यात आले आहे. दरम्यान कोणकोणत्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे ते जाणून घेऊयात 

आशिया कप (Asia Cup) 27 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.  या स्पर्धेसाठी आतापर्यंत पाकिस्तान संघाने संघ जाहीर केला होता.त्यानंतर आता भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. 

दरम्यान या संघात इग्लंड आणि वेस्ट इंडिजविरूद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.अर्शदीप सिंह,आवेश खान आणि रवि बिष्णाई या खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे.

टीम इंडियाचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या दोन खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये या खेळाडूंना संधी देण्यात आली नाही आहे. तसेच सध्या  जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलवर बंगळुरू येथील एनसीएमध्ये उपचार सुरू आहेत.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (व्हीसी), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर जडेजा, आर अश्विन, वाय चहल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार , अर्शदीप सिंग, आवेश खान.