मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्ध टी20 मालिका (Team India) टीम इंडियाने 4-1 ने खिशात घातलीय. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आशिया कपकडे लागले आहे. या आशिया कप (Asia Cup) आधी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे.
इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिज (West Indies) विरूद्ध दौऱ्यात टीम इंडियाने (Team India) युवा खेळाडूला संधी दिली होती. या युवा खेळाडूच्या कामगिरीनंतर त्यांचे आशिया कप (Asia Cup) आणि टी20 विश्वचषकासाठी (t20 world cup) सिलेक्शन होणार आहे. आता हे दोन्ही दौर संपले आहेत. त्य़ामुळे आता आशिया कपसाठी टीम इंडियाचे सिलेक्शन होणार आहे. मात्र सिलेक्शन आधी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे.
टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)आशिया कपमधून बाहेर होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहला पाठीची दुखापत झाली आहे. या त्याच्या दुखापतीतून त्याला बरे होण्यास वेळ जाणार आहे. त्यामुळे पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कप T20 स्पर्धेतून बुमराह बाहेर पडण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले की, जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो आशिया कपमध्ये खेळणार नाही. तो आमचा प्रमुख गोलंदाज आहे आणि टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने पुनरागमन करावे अशी आमची इच्छा आहे. आशिया कपमध्ये आम्ही त्याला घेऊन धोका पत्करू शकत नाही त्यामुळे दुखापत वाढण्याची शक्यता आहे.
Senior India fast bowler Jasprit Bumrah ruled out of Asia Cup due to back injury
— Press Trust of India (@PTI_News) August 8, 2022
आशिया कप (Asia Cup) 27 ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे. पाकिस्तान हा एकमेव संघ आहे ज्याने या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. तर बीसीसीआय या महिन्यात होणार्या आशिया कप T20 स्पर्धेत आपला सर्वोत्तम संघ उतरवू शकतो. विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन होईल, अशी अपेक्षा आहे.
मात्र जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाल्याने त्याचा आशिया कपमध्ये समावेश होईल की नाही यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. आता टीम घोषित झाल्यानंतरच कळणार आहे जसप्रीत बुमराहचा संघात समावेश होणार आहे की नाही ते.