दुबई : श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) करो किंवा मरोच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने दिलेलं 174 रन्सचं लक्ष्य श्रीलंकेने शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. यामुळे टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता बरीच कमी झाली असून भारत (Team India)आशिया कपमधून (Asia Cup 2022) जवळपास बाहेर पडला आहे. (Asia Cup Team India still chance for final)
श्रीलंकेला 2 बॉल्ममध्ये 2 रन्सची गरज असताना श्रीलंकेने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांना अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर मारा करता आला नाही. यावेळी बॉल विकेटकीपर पंतकडे गेला आणि तिथून गोलंदाजाकडे आला आणि थ्रो करण्याच्या गडबडीत दोन रन्स दिले आणि यामुळे भारताच्या हातून सामना निसटला.
श्रीलंकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 7 रन्सची गरज होती. अर्शदीप सिंगने टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत जोर लावला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. टीम इंडियाचा आशिया कपमधला हा सलग दुसरा पराभव होता. अशातच टीमचा या स्पर्धेतील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. मात्र अजूनही काही प्रमाणात भारताच्या आशा पल्लवित आहेत.
आशिया कप 2022 मध्ये भारताने सलग दुसरा सामना गमावला आहे, आधी पाकिस्तान आणि आता श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचणं कठीण आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे इतर टीमवर अवलंबून आहे. विशेषत: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावर.
7 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना आहे, जर पाकिस्तानने विजय मिळवला तर भारत स्पर्धेतून बाहेर पडेल आणि त्यानंतर त्याचा शेवटचा सामना केवळ औपचारिकता म्हणून राहील. अशा स्थितीत भारताला अंतिम फेरीत पोहोचण्याची केवळ एवढीच संधी आहे.