Asian Games : छोरियां छोरों से कम हैं के? टीम इंडियाने लंकेचा पराभव करत जिंकलं गोल्ड

Asian Games IND VS SL Women's Cricket Match:  25 सप्टेंबर रोजी पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट ग्राउंड मध्ये भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेचा 19 रन्सने पराभव केला. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 25, 2023, 03:11 PM IST
Asian Games : छोरियां छोरों से कम हैं के? टीम इंडियाने लंकेचा पराभव करत जिंकलं गोल्ड title=

Asian Games IND VS SL Women's Cricket Match:  भारतीय महिला क्रिकेट टीमने 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलंय. 25 सप्टेंबर रोजी पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट ग्राउंड मध्ये भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेचा 19 रन्सने पराभव केला. या सामन्यात 117 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची टीम 20 ओव्हर्समध्ये 97 रन्सचं करू शकली. टीम इंडियाने हे सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

टीम इंडियाने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. चौथ्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाला पहिला धक्का बसला. यावेळी टीम इंडियाची लेडी सेहवाह शेफाली वर्मा (9) रन्सवर आऊट झाली. यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी मिळून डाव सांभाळला. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 73 रन्सची पार्टनरशिप केली. त्यानंतर मंधाना बाद झाली. अखेरील भारताला सात विकेट्सवर केवळ 116 रन्स करणं शक्य झालं.

टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. यावेळी 14 रन्सवर असताना तीन गडी गमावले. विकेट पडल्यानंतर हसिनी परेराने डाव सांभाळत श्रीलंकेला 50 रन्सपर्यंत नेलं. अखेरीस राजेश्वरी गायकवाडने परेराची झंझावाती खेळी संपुष्टात आणली. परेराने 22 बॉल्समध्ये 25 रन्स केले. यानंतर नीलाक्षी डी सिल्वा आणि ओशादी रणसिंघे यांनी 28 रन्सची पार्टनरशिप केली. मात्र श्रीलंकेच्या टीमला शेवटी 20 ओव्हरमध्ये 97 रन्स करणं शक्य झालं.

भारताला मिळालं दुसरं गोल्ड मेडल

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला हे दुसरे सुवर्णपदक मिळालंय. यापूर्वी, नेमबाजी पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार या तिघांनी भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 11 पदकं जिंकली आहेत.