BAN vs IND, 2nd Odi : टीम इंडियासाठी 'करो या मरो' तर बांगलादेशला मालिका विजयाची संधी

बांगलादेश या (IND vs BAN) मालिकेत 1-0 आघाडीवर आहे.

Updated: Dec 6, 2022, 07:43 PM IST
BAN vs IND, 2nd Odi : टीम इंडियासाठी 'करो या मरो' तर बांगलादेशला मालिका विजयाची संधी

ढाका : टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यात बुधवारी 7 डिसेंबरला एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी शेरे बांगला स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. बांगलादेश या मालिकेत 1-0 आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर रोहितसेनेसाठी हा 'करो या मरो'चा सामना असणार आहे. (ban vs ind 2nd odi do or die match from team india at shere bangla national stadium dhaka)

बांगलादेशने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा तोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावला. बांगलादेशने टीम इंडियावर 1 विकेटने सनसनाटी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने विजयी सुरुवात केली. तर टीम इंडिया पिछाडीवर पडली . त्यामुळे आता मालिकेती आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक असणार आहे. 

एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश

लिट्टन दास (कर्णधार), अनामुल हक बिजॉय, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफीफ होसैन, यासिर अली, मेहिदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद (दुखापतग्रस्त), हसन महमूद, इबादत होसैन, नसुम अहमद, महमूदुल्लाह, नजमुल होसैन शंटो, काजी, नूरुल हसन सोहन आणि शोरीफुल हसन (राखीव)

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल.