आशिया महिला कप:बांगलादेशकडून भारताचा पहिल्यांदा पराभव

भारताचा पहिल्यांदा पराभव

Updated: Jun 6, 2018, 06:58 PM IST
आशिया महिला कप:बांगलादेशकडून भारताचा पहिल्यांदा पराभव title=

मलेशिया : मलेशिया महिला आशिया कपमध्ये भारत आणि बांगलादेश सामन्यामध्ये बांग्लादेशने भारताचा 7 विकेटने पराभव केला. पहिल्यांदा भारतविरुद्ध महिला आशिया कपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारत याआधी महिला आशिया कपमध्ये कोणत्याही फॉरमॅटमध्ये कोणताही सामना गमावलेला नाही. आशिया कपमध्ये याआधी भारताने 20 वनडे, 12 टी20 आणि 2 इतर सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताने सगळे सामने जिंकले आहेत. पण बांगलादेशने भारताचा विजयाचा हा सिलसिला रोखला आहे.

दोन्ही देशांमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 मॅचमध्ये भारताने आधी बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमवत 141 रन केले. भारताकडून हरमनप्रीत कौरने 37 बॉलमध्ये 6 फोरच्या मदतीने 42 रन केले. दीप्ति शर्माने 28 बॉलमध्ये 32 रन केले. भारताला जास्त रन करता नाही आले. टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशकडून ओपनर शमीमा सुल्तान आणि अयाशा रहमानने चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटआधी 29 रन केले. अयाशाने 12 रन केले. फरगना हकने शानदार बॅटींग केली. या दरम्यान शमीमने 23 बॉलमध्ये 7 फोर मारत 33 रन केले. फरगनाने 46 बॉलमध्ये नाबाद 52 आणि रुमानाने 34 बॉलमध्ये नाबाद 42 रन केले.