BAN vs SL: क्रिकेटचं मैदान म्हटलं तर तिथे अनेक वेगवेगळ्या आणि अनपेक्षित घटना घडत असतात. यादरम्यान धोनीसारख्या काही खेळाडूंचा चालाखपणा पाहून आश्चर्य वाटतं, तर काहींचा मूर्खपणा डोक्याला हात लावायला लावतो. बांगलादेश आणि श्रीलंकेतील कसोटी सामन्यादरम्यान असंच काहीसं झालं. बांगलादेशच्या कर्णधाराने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट डीआरएस कॉल घेत अम्पायरलाही निशब्द केलं होतं. नजमूल हुसेन शांतोने श्रीलंकेचा फलंदाज कुशल मेंडिसरच्या बॅटवर मधोमध चेंडू लागलेला असताना डीआरस घेतला होता.
कसोटी सामन्यात बांगलादेश संघ प्रथम क्षेत्ररक्षण करत होता. श्रीलंकेचे फलंदाज चांगले खेळत असल्याने बांगलादेश संघाचे खेळाडू थोडे चिंतीत होते. 96 धावांची पहिली भागीदारी झाल्यानंतर कुशल मेंडिस आणि दिमूथ मैदानावर दुसरी मोठी भागीदारी रचण्याच्या तयारीत होते.
चहापान झाल्यानंतर दोन्ही संघ मैदानात परतले होते. 44 व्या ओव्हरला डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज तैजूल इस्लामने मेंडिसला चेंडू टाकला. मेंडिस फटका लगावण्यासाठी पुढे आला होता. पण अखेरच्या क्षणी प्लेस करुन माघारी गेला. चेंडू त्याच्या बॅटच्या मधोमध लागला होता.
What just happened
.
.#BANvSL #FanCode #CricketTwitter pic.twitter.com/sJBR5jMSov— FanCode (@FanCode) March 30, 2024
यावेळी कर्णधार शांतो स्पिपला उभा होता. तो धावत पुढे आला आणि गोलंदाज आणि इतर खेळाडूंकडे पाहत पायाला लागला का याबाबत विचारत होता. संघातील कोणताही खेळाडू डीआरएस घेण्यात रस दाखवत नव्हता. पण तरीही शांतोने डीआरएससाठी अम्पायरकडे हात दाखवला. रिप्ले पाहण्यात आला असता बॉल मेंडिसच्या बॅटला लागला असून, पॅडच्या आसपासही नव्हता असं दिसलं.
दरम्यान मेंडिस (93) आणि करुणारत्ने (86) यांचं शतक थोडक्यात हुकलं. दोघे बाद झाल्यानंतर श्रीलंकेने मागोमाग विकेट्स गमावले. पहिल्या दिवशी श्रीलंकेने 300 धावा केल्या आहेत.
शांतोकडे गेल्या महिन्यात बांगलादेश संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. हा त्याचा कर्णधार म्हणून दुसराच सामना आहे. त्याने 4 कसोटी आणि टी-20 सामन्यातही संघाचं नेतृत्व केलं आहे.