Team India Review Meeting : गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं (Team India Captain Rohit Sharma) कर्णधारपद धोक्यात आलं आहे. मात्र सध्यातरी कर्णधारपदावरून त्याला कोणताही धोका नसल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) च्या अधिकाऱ्यांना या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या कर्णधारपदात कोणतीही चूक आढळली नाहीये.
बीसीसीआयने आज म्हणजेच 1 जानेवारीला एक महत्त्वाची बैठक घेतली. मुंबईतील एक हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. जवळपास 4 तास ही बैठक चालली. यामध्ये भारतीय टीम (Team India) चे हेड कोच राहुल द्रविड, नियमित कर्णधार रोहित शर्मा, एनसीए हेड व्ही व्ही एस लक्ष्मण तसंच चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांना समावेश होता. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
असं म्हटलं जातंय की, आज या बैठकीत चेतन शर्मा देखील उपस्थित होते. त्यामुळे चीफ सिलेक्टरचं पद पुन्हा एकदा तेच सांभाळण्याची शक्यता आहे. सध्या फोकस हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर आहे. यामध्या टीम इंडिया फायनल गाठण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जातोय. याशिवाय 2023 मध्ये वनडे वर्ल्डकप देखील होणार आहे. नवा टी-20 कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या बैठकीसाठी उपस्थित नव्हता.
हार्दिक पंड्या मंगळवारपासून श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सिरीजसाठी मुंबईत आला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “रोहित वनडे आणि टेस्ट टीमचं नेतृत्व सांभाळतोय. या दोन फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून त्याच्या भविष्याविषयी कोणतीही चर्चा कऱण्यात आली नाही. टेस्ट आणि वनडे सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून त्याचा रेकॉर्ड चांगला आहे.
बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी 20 सदस्यांची टीम निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता बीसीसीआय या खेळाडूंना फीट करण्यासाठी आहे. यामुळेच बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी एनसीएला आयपीएल टीमसोबत खेळाडूंच्या सुरक्षेसाठी वर्कलोड मॅनेजमेंटवर काम करण्यास सांगितलंय.
बीसीसीआयने या बैठकीत सांगितलं की, आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंवर एनसीए लक्ष ठेवणार आहे. NCA ने आयपीएल फ्रेंचाइजीसोबत मिळून काम करावं असं आम्हाला वाटतं.
बीसीसीआयने अळा 20 खेळाडूंची निवड केलीये, जे या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा भाग असणार आहेत. या सर्व खेळाडूंना पुन्हा खेळण्याची संधी दिली जाईल ज्यामुळे वर्ल्डकपसाठी ते पूर्णपणे तयार असतील. बीसीसीआयच्या म्हणण्याप्रमाणे, खेळाडूंच्या फिटनेसबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाहीये.