BCCI नवीन कॉन्ट्रॅक्टमुळे हे 3 खेळाडू मालामाल; दरवर्षी मिळणार 7 कोटी

BCCIने या वर्षाची आपल्या क्रिकेटर्ससाठीची नवीन कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर केली आहे.

Updated: Mar 3, 2022, 08:21 AM IST
BCCI नवीन कॉन्ट्रॅक्टमुळे हे 3 खेळाडू मालामाल; दरवर्षी मिळणार 7 कोटी title=

मुंबई : BCCIने या वर्षाची आपल्या क्रिकेटर्ससाठीची नवीन कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 27 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. BCCIच्या नवीन कॉन्ट्रॅक्ट लिस्टनुसार, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह ए- प्लस लिस्टमध्ये आहेत. या कॉन्ट्रॅक्टनुसार, या खेळाडूंना प्रत्येक वर्षाला 7 कोटी रूपये मिळणार आहेत.

ए-ग्रेडमध्ये 5 खेळाडूंना संधी

गेल्या वर्षी बीसीसीयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये 10 खेळाडूंचा ए-ग्रेडमध्ये समावेश होता. ज्यांच्यामध्ये आता कपात करून केवळ 5 जणांचा समावेश ठेवण्यात आला आहे. यामध्ये रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत, लोकेश राहुल आणि मोहम्मद शमी यांची नावं आहे. ए ग्रेडमध्ये समावेस असलेल्या खेळाडूंना कॉन्ट्रॅक्टनुसार, दरवर्षी 5 कोटी रूपये मिळणार आहेत. 

बी-ग्रेडमध्ये या खेळाडूंचं नावं

गेल्यावर्षी ए-ग्रेडमध्ये चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांची नावं होती. मात्र खराब फॉर्ममुळे या खेळाडूंना आता बी-ग्रेडमध्ये टाकण्यात आलं आहे. मोहम्मद सिराजने त्याच्या कामगिरीने बी-ग्रेडमधील जागा कायम ठेवली आहे. नवीन कॉन्ट्रॅक्टनुसार, त्यांना दरवर्षी 3 कोटी रूपये मिळणार आहेत. 

हार्दिक पंड्याला मोठा झटका

गेल्यावर्षी ए- ग्रेडमध्ये असलेला ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला यावेळी थेट ग्रेड-सीमध्ये टाकण्यात आलं आहे. गेल्यावर्षीपासून हार्दिक दुखापतग्रस्ती आहे. या ग्रुपममध्ये हार्दिकसोबत शिखर धवनाचाही समावेश आहे.