IND vs AUS 1st Test Cameron Green : न्यूझीलंडच्या सिरीजनंतर टीम इंडियाला बॉर्ड-गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळायची आहे. मात्र या टेस्ट सामन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये होणाऱ्या टेस्ट (Nagpur test) सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू बाहेर होऊ शकतो. मात्र ही बातमी टीम इंडियासाठी काहीशी दिलासादायक आहे. कारण टीम इंडियासाठी हा खेळाडू मोठी अडचण ठरू शकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 9 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या मैदानात पहिली टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. या सिरीजबात चाहत्यांच्या मनात फार उत्साह आहे. कारण भारताकडून ऑस्ट्रेलियाला नेहमी आव्हानाचा सामना करावा लागला आहे. या टेस्ट सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन (Cameron Green) बोटाला झालेल्या दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकत नसल्याची माहिती आहे.
जर ग्रीन गोलंदाजी करण्यास सक्षम नसेल तर त्याला फलंदाजी करता येणंही शक्य नाही. परिणामी त्याला पहिल्या टेस्टमध्ये बाहेर बसावं लागण्याची अधिक शक्यता आहे. सध्यातरी ऑस्ट्रेलिया न्यूज वेबसाईट फॉक्स क्रिकेटने तो गोलंदाजी करणार नसल्याचं म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या सिरीजमध्ये कॅमरून ग्रीनला दुखापत झाली होती. यावेळी त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झालं आहे. मात्र अजूनही तो पूर्णपणे या दुखापतीतून रिकव्हर झाला नाहीये. ज्यामुळे नागपूरमध्ये होणाऱ्या टेस्टमध्ये त्याला खेळता येणार नाहीये. दरम्यान याबाबत ऑस्ट्रेलिया कोच एंड्रयू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी चिंता व्यक्त केली आहे.
एंड्रयू मॅकडोनाल्ड यांच्या सांगण्याप्रमाणे, सध्या तो ज्या परिस्थितीत आहे, त्या परिस्थितीत त्याला गोलंदाजी करणं फार कठीण आहे. त्याच्या बोटासंदर्भात सोमवारी पुन्हा एकदा टेस्ट केली जाणार आहे. यामध्ये फ्रॅक्चर झालेलं बोटं बरं झालंय का, हे पाहण्यात येईल.
मुंबई इंडियन्सच्या टीमने आयपीएल 2023 सिझनसाठी ऑस्ट्रेलियाचा धोकादायक ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनला 17.25 कोटींना खरेदी केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन आयपीएलच्या इतिहासात दुसरा सर्वात महागडा विकला गेलेला खेळाडू आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन विस्फोटक फलंदाजी आणि उत्तम गोलंदाजी करतो. या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या टी-20 सिरीज खेळण्यासाठी आली होती, त्यावेळी कॅमरूनने तुफान फलंदाजी करत गोलंदाजांची दाणादाण उडवली होती.