कोरोनाचा धोका : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका अडचणीत

कोरोना रुग्णवाढीमुळे (Corona crisis) भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिका ( India-Australia cricket Test series) अडचणीत आली आहे.  

Updated: Nov 18, 2020, 05:15 PM IST
कोरोनाचा धोका : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका अडचणीत  title=
Image credits: Twitter/@cricketcomau

मुंबई : कोरोना रुग्णवाढीमुळे (Corona crisis) भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिका ( India-Australia cricket Test series) अडचणीत आली आहे. टीम पेन, लबूशेनसह क्रिकेटपटूंना अॅडलेडहून न्यू साऊथ वेल्सला हलवले आहे. कसोटी मालिका (Test series) वाचवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया मंडळाने ठोस पावलली आहेत.

१७ डिसेंबरपासून सुरू होणारी भारत ( India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेट कसोटी मालिका (cricket Test series) अडचणीत सापडली आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने कसोटी मालिका अडचणीत सापडली आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेत आहे.

तसेच भारत आणि ऑस्ट्रेलियात यांच्यात होणारी पहिली कसोटी होईल यासाठी प्रयत्न करत असल्याचे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी सांगितले आहे.

 टीम इंडिया कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर, अजिंक्य  रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, साहा (विकेटकिपर), वृषभ पंत (विकेटकिपर), बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज