Asia Cup स्पर्धेसाठीच्या संघात अचानक मोठा बदल, 'हा' मॅचविनर खेळाडू बाहेर

Asia Cup 2023: एशिया कप 2023 आधीच स्पर्धेतील एका संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे संघातील स्टार खेळाडू अचानक संघातून बाहेर पडला आहे. या मुळे संघाला मोठा धक्का बसला असून एकदिवसीय विश्वचषकातही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. 

Updated: Aug 22, 2023, 07:01 PM IST
Asia Cup स्पर्धेसाठीच्या संघात अचानक मोठा बदल, 'हा' मॅचविनर खेळाडू बाहेर title=

Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेला आता काहि दिवसांचाच अवधी राहिला आहे. येत्या 30 ऑगस्टपासून 17 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदा एशिया कप स्पर्धेचा आयोजक पाकिस्तान (Pakistan) असला. तरी हायब्रिड मॉडेलमुळे (Hybrid Model)  श्रीलंकेतही (Sri Lanka) काही सामने खेळवले जाणार आहेत. भारतासह स्पर्धेतील चार देशांनी संघांची घोषणा केली आहे. पण यातल्या एका देशाला आपल्या संघात अचानक बदल करावा लागला आहे. संघाचा मॅचविनर खेळाडू अचानक संघातून बाहेर पडला आहे. 

मॅचविनर खेळाडू बाहेर
एशिया कप स्पर्धेच्या (Asia Cup 2023) तोंडावर बांगलादेश संघाला (Bangladesh) मोठा धक्का बसला आहे. संघात अचानक बदल करावा लागला आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसैन (Ebadot Hossain) दुखापतीमुळे एशिया कप स्पर्धेमुळे संघातन बाहेर झाला आहे. अफगाणिस्ताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत इबादत हुसैनच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. काही दिवसांपूर्वी बांगलादेशचा 17 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला होता. यात इबादत हुसैनचाही समावेश करण्यात आला होता. पण अद्यापही इबादत दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे अखेर त्याला संघाबाहेर करण्याता निर्णय घेण्यात आला आहे. 

 इबादत हुसैन भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यातूनही बाहेर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  इबादतच्या जागी 20 वर्षांचा वेगवागन गोलंदाज तंजीम हसनला संघात संधी देण्यात आली आहे. तंजीम हसनने लिस्ट ए सामन्यात 57 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेत झालेल्या एसीसी इमर्जिंग मेन्स एशिया कप स्पर्धेत तंजीमने तीन सामन्यात नऊ विकेट घेतल्या होत्या. ढाका प्रीमिअर लीगमध्ये तंजीमने तब्बल 17 विकेट घेतल्या होत्या. 

एशिया कप 2023 साठी बांगलादेशचा संघ
शाकिब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, तनजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शान्तो, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन मम्हूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसैन, अफीफ हुसैन, शोरफुल इस्लाम, तंजीम हसन, मोहम्मद नईम

एशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक
30 ऑगस्ट : पाकिस्तान vs नेपाळ - मुलतान
31 ऑगस्ट: बांग्लादेश vs श्रीलंका - कँडी 
2 सप्टेंबर : भारत vs पाकिस्तान - कँडी
3 सप्टेंबर : बांग्लादेश vs अफगाणिस्तान - लाहोर
4 सप्टेंबर: भारत vs नेपाल - कँडी
5 सप्टेंबर : श्रीलंका vs अफगाणस्तान - लाहोर

6 सप्टेंबर : A1 Vs B2 - लाहोर 
9 सप्टेंबर : B1 vs B2 - कोलंबो  
10 सप्टेंबर : A1 vs A2 - कोलंबो  
12 सप्टेंबर : A2 vs B1 - कोलंबो  
14 सप्टेंबर : A1 vs B1 - कोलंबो 
15 सप्टेंबर : A2 vs B2 - कोलंबो 
17 सप्टेंबर : फाइनल - कोलंबो