India vs New Zealand 2nd ODI 2022: भारत (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. पावसामुळे 4 षटकांनंतर सामना थांबवण्यात आला आहे. (Cricket News) भारताने पहिल्यांदा फलंदाजीला सुरुवात केली. पण, 4 षटकांत 22 धावा केल्यानंतर पावसाचा व्यत्यय आला. असे असलं तरी मालिका जिंकण्यासाठी भारताला आजचा विजय गरजेचा आहे.
भारत (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येथे खेळला जात आहे. पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडिया हा सामना महत्वाचा आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत टीम इंडियाची कमान शिखर धवनच्या हाती आहे.
खेळपट्टीच्या पाहणीच्या दहा मिनिटे आधी पुन्हा पाऊस सुरु झाला. खेळपट्टीवर कव्हर्स परत आणण्यात आले आहेत. खेळपट्टी तपासणीला पुन्हा विलंब झाला. त्यामुळे सामना कमी षटकांचा करण्यात आला आहे. दरम्यान, सामना 29-29 षटकांचा खेळविण्यात येण्याची शक्यता आहे. तशी घोषणा केली. मात्र, पाऊस थांबण्याची नाव घेत नाही. पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्याची षटके कमी करण्यात आली आहेत. आता 29-29 षटकांचा सामना होणार आहे. डावात 10 मिनिटांचा ब्रेक असेल तर ड्रिंक्स ब्रेक नसेल. सततच्या पावसामुळे पंचांना ओव्हर कमी करणे भाग पडले आहे.
पावसाने खेळ थांबला त्यावेळी शिखर धवन आणि शुभमन गिल मैदानावर होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येथे खेळला जात आहे. पावसामुळे 4.5 षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला. पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडिया सध्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. (India vs New Zealand 2nd ODI 2022) न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला हा सामना महत्वाचे आहे. तसेच न्यूझीलंडचा संघ सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.
दरम्यान, भारतीय कर्णधार शिखर धवन 10 चेंडूत तीन धावा करुन बाद झाला. मॅट हेन्रीच्या चेंडूवर त्याला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद केले. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या एक बाद 25 धावा अशी आहे.