मैदानात चाणाक्ष, अभ्यासात कसा होता कॅप्टन कूल, 10 वी आणि 12वीत मिळाले होते इतके गुण...

चालाख, चपळ आणि कूल असलेला धोनी किती शिकलाय माहितीय का?

Updated: Oct 13, 2022, 07:08 PM IST
मैदानात चाणाक्ष, अभ्यासात कसा होता कॅप्टन कूल, 10 वी आणि 12वीत मिळाले होते इतके गुण...  title=

MS Dhoni School Life : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात (Indian Cricket History) सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंग धोणीची (M S Dhoni) गणना होते. आपल्या नेतृत्वाखाली धोणीने टीम इंडियाला (Team India) एक नवी उंची गाठून दिली. आयसीसीच्या सर्व वर्ल्ड कप स्पर्धा (ICC World Cup) जिंकण्याचा मान धोणीला जातो. यशस्वी कर्णधाराबरोबरच यशस्वी विकेटकिपर आणि फलंदाज म्हणूनही त्याने क्रिकेट जगतावर आपली छाप उमटवली. निवृत्तीनंतर धोणीच्या चाहत्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. निवृत्तीनंतर धोणी काय करतो, त्याचं शालेय जीवन कसं होतं, याविषयी चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.

धोणीचं शालेय जीवन
धोणीला शालेय जीवनापासूनच क्रिकेटची आवड होती, शिक्षणात त्याचं फारसं लक्ष नसायचं. त्यामुळे तो 10 तरी पास होईल की नाही याची त्यांच्या वडिलांना अजिबात शाश्वती नव्हती. एका मुलाखतीत धोणीने आपल्या शालेय जीवनातले मजेदार किस्से सांगितले. दहावीचा निकाल येणार होता, त्यादिवशी वडिल खूप चिंतेत होते. त्यांना वाटत होतं, की माहीला दहावीची परीक्षा पुन्हा द्यावी लागेल. पण जेव्हा त्यांना कळलं की माहि 10वी पास झाला, तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला. 

सातवीत असताना क्रिकेट 
धोणीने सांगितलं, सातवीत असल्यापासून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हळूहळू शाळेतील उपस्थिती कमी होऊ लागली. पण यानंतरही धोणीने दहावीत 66  टक्के तर 12 वीत 56 टक्के गूण मिळवले.

महेंद्रसिंग धोणीचं बालपण
झारखंडमधल्या रांची इथं 7 जुलै 1981 ला महेंद्रसिंग धोणीचा जन्म झाला. कुटुंब आणि मित्रपरिवारामध्ये तो माही या टोपणनावाने ओळखला जातो. माही लहान असताना त्याचे आईवडिल उत्तराखंड इथून रांचीला स्थलांतरित झाले. त्याचे वडील पानसिंग मेकॉनमध्ये ज्युनिअर मॅनेजमेंट पदावर कार्यरत होते. माहिला जयंती गुप्ता ही बहिण आणि नरेंद्र धोणी हा भाऊ आहे. शाळेत असतान धोणीला फूटबॉल खेळाची आवड होती. शाळेच्या फूटबॉल संघाचा तो गोलकिपर होता. शाळेच्या क्रिकेट प्रशिक्षकांनी त्याला क्रिकेट खेळण्यास सांगितलं.