मुंबई : Cricket News : पाकिस्तानला (Pakistan) दुसरा धक्का बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये क्रिकेट (Pakistan Cricket) सामने होणार नसल्याचे पुढे आले आहे. न्यूझीलंडनंतर ( New Zealand) आता इंग्लंडनही (England) पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संघांच्या पाकिस्तानात सामने होणार होते. सुरक्षेच्या कारणास्तव हे सामने रद्द करण्यात आले आहेत. ऑक्टोबरमध्ये T-20 सामने इंग्लंड आणि पाकिस्तानदरम्यान होणार होते. 2005नंतर इंग्लंड पाकिस्तानात येणार होता. (England men's and women's tour of Pakistan cancelled by ECB)
न्यूझीलडंने माघार घेतल्यानंतर इंग्लंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव आगामी पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संघांच्या पाकिस्तानात होणाऱ्या अतिरिक्त सामन्यांविषयी चर्चा करण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची बैठक झाली. त्यानंतर दौरा रद्द करण्यात आला आहे.
पुढील महिन्यात ऑक्टोबरला होणाऱ्या या दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ECBने म्हटले आहे. इंग्लंडचा संघ 2005 नंतर प्रथमच पाकिस्तानचा दौरा करणार होता. 13 आणि 14 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध त्यांचे दोन T-20 सामने होणार होते. दरम्यान, आता न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा पुढील वर्षी, होण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंड संघाने पाकिस्तान दौऱ्यातून अचानक माघार घेतली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी काही तास न्यूझीलंडने सामन्यात खेळण्यास नकार दिला. परंतु न्यूझीलंडचा संघ तीन एकदिवसीय आणि पाच T-20 सामन्यांसाठी पुढील वर्षी पाकिस्तान दौरा करण्यासाठी शक्यता आहे. याबाबतची माहिती न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी दिली आहे.