मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे IPL आणि टी 20 वर्ल्ड कपची तयारी सुरू करण्यात आली आहे. याच दरम्यान क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी येत आहे. Ashes सीरिज इंग्लंडच्या खेळाडूंनी बहिष्कार घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या एशेज सीरिजवर इंग्लंडच्या खेळाडूंनी बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.
एशेज सीरिजसाठी जवळपास 4 महिने क्रिकेटपटूंना क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. कोरोनाच्या कठोर नियमांमुळे 4 महिने केवळ एका रुमपर्यंत बंधिस्त राहण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या सीरिजवर इंग्लंडचे खेळाडू बहिष्कार टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
क्रिकइन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडच्या खेळाडूंना पाठवण्यावर इंग्लंड क्रिकेटबोर्ड ठाम आहे. त्यामुळे एशेज सीरिज स्थगित होणार नाही हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात इंग्लंडचे वरिष्ठ खेळाडू आणि सपोर्टिव्ह स्टाफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे इंग्लंडकडून दिग्गज खेळाडू उतरण्याची शक्यता कमी आहे.
एशेज सीरिजमध्ये इंग्लंडकडून जर तगडे खेऴाडू उतरले नाहीत तर सहाजिकच इंग्लंडचं मोठं नुकसान होऊ शकतं. ईसीबी आपल्या निर्णयावर ठाम आहे तर खेळाडूंची या निर्णयाला नाराजी असल्याने आता एशेज सीरिजचं नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. एशेज सीरिज ही इंग्लंडसाठी खूप मोठी मानली जाते त्यामुळे यासाठी कोणते खेळाडू मैदानात उतरणार पाहावं लागणार आहे.
England could boycott the Ashes tour
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 15, 2021