सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या तिसर्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी अचानक खेळ मध्येच थांबला. मोहम्मद सिराजने तक्रार दिल्यानंतर खेळ थोडा थांबवावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांकडून चुकीच्या भाषेचा वापर होत असल्याची तक्रार केल्यानंतर 86 व्या ओव्हरमध्ये सामना थांबवण्यात आला होता.
सिराजने कर्णधार अजिंक्य रहाणेला याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोघांनी पंच पॉल रायफलशी चर्चा केली. भारताने तिसऱ्या दिवशी ही खेळ संपल्यानंतर याबाबत तक्रार केली होती. आज पुन्हा सिराज बॉंड्री लाईनवर फिल्डींग करत असताना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून चुकीच्या शब्दांचा वापर केला गेला. तक्रारीनंतर दोन्ही अंपायर यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर मैदानावर उपस्थित सुरक्षा रक्षकांनी काही प्रेक्षकांना बाहेर काढलं आहे. त्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला.
India vs Australia 3rd test match was halted for some time after India players complained of abuse from the crowd. Now it's tea break: BCCI Sources.
— ANI (@ANI) January 10, 2021
ऑस्ट्रेलिया टीमने 87 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 312 रन केले. ऑस्ट्रेलिया संघाकडे 406 रनची आघाडी झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने इनिंगची घोषणा केली. भारतापुढे ऑस्ट्रेलियाने 407 रनचं आव्हान ठेवलं आहे.
Tum karo toh Sarcasm , aur koi Kare toh Racism .
Very unfortunate with what some of the Australian crowd has been doing at the SCG and spoiling the vibes of a good test series. pic.twitter.com/mrDTbX4t7i— Virender Sehwag (@virendersehwag) January 10, 2021