भर मैदानात तिने विचारलं, 'पांड्या आज करके आया क्या?'

हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांनी केलेल्या एका बेजबाबदार आणि आक्षेपार्ह वक्तव्यामुळेच या वादाने खऱ्या अर्थाने डोकं वर काढलं. 

Updated: Feb 10, 2019, 12:14 PM IST
भर मैदानात तिने विचारलं, 'पांड्या आज करके आया क्या?' title=

ऑकलंड : 'कॉफी विथ करण' हा चॅट शो नेहमीच चर्चेत असतो. पण, निर्माता दिग्दर्शनक करण जोहरच्या या कार्यक्रमाचं यंदाचं पर्व हे काहीसं वादग्रस्तही ठरलं. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांनी केलेल्या एका बेजबाबदार आणि आक्षेपार्ह वक्तव्यामुळेच या वादाने खऱ्या अर्थाने डोकं वर काढलं. ज्याचा फटका पांड्या आणि राहुलला बसला. पुढे त्यांच्यावरचं निलंबन उटवण्यात आलं खरं. पण, अद्यापही ही चर्चा मात्र शमलेली नाही हे मात्र स्पष्ट होत आहे. 

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून, तिथेही या साऱ्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. ऑकलंड येथे पार पडलेल्या टी२० सामन्यात याचाच प्रत्यय पाहायला मिळाला. जेव्हा चाहत्यांमध्ये बसलेल्यांपैकी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका मुलीने पांड्याच्या वक्तव्यावरुन त्याचीच फिरकी घेतल्याचं पाहायला मिळाली. 

भर मैदनात पांड्या आज करके आया क्या? असं ठळक अक्षरांमध्ये लिहिलेलं एक फलक घेऊन ती मुलगी हात उंचावून उभी होती. त्याचवेळी कॅमेऱ्याने हा सर्व प्रकार टीपला आणि मग काय.... सोशल मीडियावर बघता बघता ही मुलगी आणि तिच्या हातातील पोस्टर असं काही व्हायरल झाली की क्रिडा विश्वापासून सर्वत्र तिची आणि त्या लक्षवेधी पोस्टरचीच चर्चा सुरू झाली. महिलांविषयी बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या पांड्याची एका महिलेने घेतलेलली फिरकी पाहता त्याची पुन्हा एकदा खिल्ली उडवली गेली. 'हे ऑनलाईन नव्हे तर खरंखुरं ट्रोलिंग आहे', असं म्हणत नेटकऱ्यांनीही पांड्याची पुन्हा एकदा फिरकी उडवल्याचं पाहायला मिळालं. 

ऑकलंडमध्ये झालेल्या टी२० सामन्यात फक्त पांड्याच नव्हे तर, न्यूझीलंडच्या एका खेळाडूनविरोधातही पोस्टरबाजी करत #MeToo च्या मुद्दयारुन त्याच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे सामना हा फक्त खेळाडूंमुळे किंवा त्यांच्या खेळीमुळे नव्हे तर, क्रीडारसिकांमुळेही खऱ्या अर्थाने गाजला असंच म्हणावं लागेल.