शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज असती तर...; पांड्याचं वक्तव्य चर्चेत

मॅच जिंकवल्यानंतर पांड्याचं विधान चर्चेत, नक्की काय म्हणाल पांड्या  

Updated: Aug 29, 2022, 04:10 PM IST
शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज असती तर...; पांड्याचं वक्तव्य चर्चेत title=

Asia cup 2022 Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तानमधील हाय व्होल्टेज सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत गेलेला सामना श्वास रोखून धरणारा होता. अष्टपैलू हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकामध्ये सिक्स मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं. पांड्याने मॅचनंतर बोलताना केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये फक्त 7 धावांची गरज होती. 15 धावांची जरी गरज असती तरी मी पूर्णपणे तयार होतो. कारण मला माहित होतं शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजावर दबाव असतो, असं हार्दिक पांड्या म्हणाला.

जेव्हा तुम्ही अशा लक्ष्याचा पाठलाग करत असता तेव्हा तुम्हाला रणनीती आखण्याची गरज असते. शेवटच्या तीन षटकांसाठी नसीम किंवा शाहनवाझ दहनी आणि डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाज हे गोलंदाज असणार आहेत हे मला माहित असल्याचं हार्दिक पांड्याने सांगितलं.

दरम्यान, हार्दिकने पाकविरूद्धच्या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली. 25 धावा देत त्याने 3 विकेट्स घेतल्या आणि अवघ्या 17 चेंडूंमध्ये 33 धावांची मॅचविनिंग खेळी केली.