धोनीच्या CSK मध्ये हार्दिकचं स्वागत नाही; मग कोणत्या संघात लागली वर्णी?

ठरलं! हार्दिक पांड्या IPL 2022 मध्ये या संघाकडून खेळणार, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

Updated: Jan 18, 2022, 06:42 PM IST
धोनीच्या CSK मध्ये हार्दिकचं स्वागत नाही;  मग कोणत्या संघात लागली वर्णी? title=

मुंबई : देशात कोरोनाचं संकट आहे. लसीकरण मोहीम वेगानं राबवली जात आहे. सर्वांनाच प्रतिक्षा असणाऱ्या आयपीएलसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. मेगा ऑक्शन आणि आयपीएलवर कोरोनाचं संकट आहे. मात्र यंदा सर्व ती काळजी घेऊन स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. हार्दिक पांड्या संदर्भात एक मोठी अपडेट येत आहे. 

हार्दिक पांड्यासाठी महेंद्रसिंग धोनी चेन्नई फ्रान्चायझीसोबत बोलत होता अशा चर्चा होत्या. हार्दिक पांड्या चेन्नई संघाकडून खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. हार्दिक पांड्या कोणत्या संघाकडून खेळणार हे आता निश्चित झालं आहे. 

हार्दिक पांड्या ऑलराऊंडर असला तरी तो दुखापतीमुळे बॉलिंग करू शकत नाही. त्यामुळे 6 व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी तो उतरायचा. प्रत्येक संघाला 3 खेळाडू निवडण्याची मुभा आहे. त्यातही हार्दिकची कामगिरी विशेष उल्लेखनीय नाही. त्यामुळे मुंबई संघाने त्याला रिटेन केलं नाही. 

मुंबई संघातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याला अहमदाबाद फ्रान्चायझीने आपल्याकडे घेतलं आहे. अहमदाबाद संघात हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल यांची निवड केली आहे. तर हार्दिक पांड्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाणार का याबाबतही सध्या चर्चा आहेत. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. अहमदाबद संघाला किशनलाही घ्यायचं आहे. आता मुंबई इंडियन्स आणि अहमदाबाद या दोन संघांमध्ये चुरस लागणार आहे. त्यामुळे कोण जास्त बोली लावून किशनला आपल्याकडे घेतं हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.