CSK Qualification Scenario: बुधवारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 7 विकेट्सने पराभव झाला आहे. दरम्यान या पराभवानंतर चेन्नईची टीम प्लेऑफ कशी गाठणार हा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. चेन्नई सुपर किंग्जला पंजाब किंग्जविरुद्ध दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याचवेळी, या पराभवानंतर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा प्लेऑफमधील मार्ग कठीण होताना दिसतोय.
चेन्नई सुपर किंग्जची टीम प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा प्रबळ दावेदार मानली जातेय. पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचे 10 सामन्यांत 10 गुण झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत ही टीम पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
यंदाच्या सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे 4 सामने बाकी आहेत. गेल्या वर्षांची आकडेवारी पाहिली तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला किमान 3 सामने जिंकावे लागतील. जर ही टीम 3 सामने जिंकण्यात यशस्वी ठरली तर 14 सामन्यांनंतर त्याचे 16 गुण होणार आहेत. 16 पॉईंट्सह चेन्नई सुपर किंग्जचं स्थान अधिक बळकट होणार आहे. आता चेन्नई सुपर किंग्जला पंजाब किंग्जशिवाय गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याशी सामना खेळायचा आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सची टीम अग्रस्थानी कायम आहे. राजस्थान रॉयल्स 10 सामन्यांत 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये खेळणार हे जवळपास निश्चित झालंय. कोलकाता नाईट रायडर्सने 9 सामन्यांत 12 पॉईंट्सह दुसऱ्या स्थानावर आहे. तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सचेही 12 पॉईंट्स आहेत. चेन्नई सुपर किंग्जशिवाय सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रत्येकी 10 गुण आहेत.
पंजाब किंग्सने 7 विकेट्सने चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या होमग्राउंडवर पराभूत केलं आहे. या विजयासोबतच पंजाबने गुजरात टायटन्सला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये 2 महत्वाचे पॉइंट्स घेत टेबलमध्ये 7 व्या स्थानावर उडी घेतलीये. या विजयामुळे अजूनही पंजाबच्या प्लेऑफच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत.