मुंबई : आयसीसीने ताजी टी 20 रँकिंग (Icc T20I Batting Rankings) जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या काही खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे. तर काही क्रिकेटपटूंना तगडा फटकाही बसला आहे. रोहित शर्माच्या खास मित्राने टी 20 रँकिंगमध्ये मोठी उडी घेतली आहे. तर माजी आणि विद्यमान कर्णधार तसेच ओपनर बॅट्समन या तिघांचं नुकसान झालं आहे. (icc t20i rankings team india shreyas iyer jumping a massive 27 spots and virat kohli out of top 10 and k l rahul drop down to 10th spot)
मुंबईकर श्रेयसची मोठी उडी
मुंबईकर आणि रोहित शर्माचा खास मित्र श्रेयस अय्यरला श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत केलेल्या कामगिरीचा मोठा फायदा झालाय. श्रेयसने मोठी उडी घेतली आहे.
श्रेयसने थेट 27 स्थानांनी मोठी झेप घेतली आहे. यामुळे श्रेयस पहिल्या 20 फलंदाजांमध्ये पोहचला आहे. ताज्या आकडेवारीनुसार श्रेयस 18 व्या क्रमांकावर पोहचला आहे. श्रेयस श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी 45 व्या क्रमांकावर होता. श्रेयसचे 600 रेटिंग्स पॉइंट आहेत.
श्रेयसने श्रीलंका विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत धमाकेदार कामगिरी केली होती. श्रेयसने सलग 3 सामन्यात नाबाद 3 अर्धशतक झळकावली. त्याने या मालिकेत एकूण 204 धावा केल्या.
विराट, रोहित आणि केएलचं नुकसान
एका बाजूला श्रेयसला मोठा फायदा झाला. तर दुसऱ्या बाजूला ओपनर केएल राहुल आणि विराट कोहलीला फटका बसला आहे. विराटला श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्याचाच फटका विराटला बसला आहे.
विराट पहिल्या 10 मधून बाहेर पडला आहे. विराट या रँकिंगमध्ये 15 व्या स्थानावर आहे. केएलची 10 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा 13 व्या क्रमांकावर आहे.
Rashid Khan breaks into top 10 ODI bowlers
Pathum Nissanka moves to No.9 in T20I batters’ listFull rankings https://t.co/saWOSRZ2py pic.twitter.com/UUXbK8RDme
— ICC (@ICC) March 2, 2022