World Cup 2023 : यंदाच्या वर्षात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वन डे वर्ल्ड कप (World Cup 2023) भारतात होणार आहे. यजमान भारतासह सात संघ वर्ल्ड कप 2023 साठी पात्र ठरले आहेत आणि आता उर्वरित 3 जागांसाठी 15 संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहेत. त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) यांच्यात जून महिन्यात आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिचा (ICC Test World Championship) फायनल सामना खेळला जाणार आहे. या दोन्ही मोठ्या स्पर्धेत कोणता संघ जिंकणार? याबाबत मोठी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) केली आहे. भारतात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेला अजून 7 महिने बाकी आहे. तरीही यंदा होणाऱ्या 2023 चा विश्वचषक ट्रॉफी कोणता संघ जिंकेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही 7 जून 2023 सुरूवात होणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC Test World Championship) फायनलच्या विजेत्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर खेळवला जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चे जेतेपद कोणता संघ जिंकेल याविषयी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली म्हणाला, 'ऑस्ट्रेलिया संघ जिंकू शकतो. कारण भारत हा एक चांगला संघ आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अधिक फायदा मिळेल. हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल, असा विश्वास ब्रेट लीने व्यक्त केला आहे.
वाचा: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना रद्द? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी
स्पोर्ट्स यारीशी बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक या दोन्ही स्पर्धेबाबत भाष्य केले. त्यावेळी ब्रेट ली म्हणाला, 'भारत 2023 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. वर्ल्डकपमध्ये भारताला पराभूत करणे कठीण होईल. कारण हा सामना भारताच रंगणार आहे. त्यामुळे मायदेशात भारत अधिक आक्रमक पद्धतीने क्रिकेट खेळणार. यामुळे एकदिवसीय विश्वचषकावर भारत नाव कोरले जाण्याची जास्त शक्यता आहे.