ICC World cup Australia World Champion : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता (Australia Win World Cup) ठरला आहे. 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळवण्यात आलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा (Australia beat India) सहा विकेट राखून पराभव केला. या विजयबरोबर ऑस्ट्रेलियाने तब्बल सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं होतं. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 43 षटकात पार केलं. स्पर्धेत सलग दहा सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागला आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलं.
ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस
विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस (Prize Money) पडला आहे. ऑस्ट्रेलियाला तब्बल 40 लाख डॉलर म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 33.33 कोटी रुपये मिळाले आहेत. तर उपविजेत्या भारताला 20 लाख डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 16.65 कोटी रुपयांची प्राईजमनी मिळाली आहे. याशिवाय लीग स्टेजमध्ये जिंकलेल्या प्रत्येक सामन्यासाठीही भारत आणि ऑस्ट्रेलियाला पैसे मिळालेत.
आयसीसीकडून 83 कोटी रुपयांचं वाटप
आयसीसीने यंदा बक्षीसाच्या रकमेत भरघोस वाढ केली होती. यंदाच्या विश्वचषकात तब्बल 10 मिलिअन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 83.29 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 10 संघांवर पैशांची खैरात करण्यात आलीय. सेमीफायनलमध्ये हरणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी 8 लाख डॉलर देण्यात आले आहेत. तर लीग स्टेजमध्ये विजयी झालेल्या प्रत्येक सामन्यासाठी प्रत्येकी 33.31 लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं.
क्रिकेट विश्वचषकाची प्राइज मनी (भारतीय रुपयात)
- वर्ल्ड कप विजेता: करीब 33 कोटी रुपये (ऑस्ट्रेलिया)
- वर्ल्ड कप उप-विजेता: 16.65 कोटी रुपये (भारत)
• सेमीफाइनलिस्ट: 6.66 कोटी रुपये (साउथ अफ्रीका, न्यूजीलंड)
• ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक विजयसाठी : 33.31 लाख रुपये
भारतीय संघाला मिळाले इतके पैसे
आयसीसी विश्वचषकात उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाला 16.65 कोटी रुपये मिळालेत. याशिवाय स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) सलग 10 सामने जिंकले. प्रत्येक विजयासाठी 33.31 लाख रुपयांप्रमाणे 3.33 कोटी रुपये देण्यात आलेत. म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने एकूण 24 लाख डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत 20 कोटी रुपयांची कमाई केली.
IND
(23.5 ov) 90/2 (113 ov) 471
|
VS |
ENG
465(100.4 ov)
|
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.