मुंबई : भारताचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये मुंबई टीमकडून खेळतो आहे. आपल्या टीमला निर्णायक क्षणी मॅच जिंकवून देण्याची तसेच अखेरच्या टप्प्यात येऊन फटकेबाजी करण्यात हार्दिक पांड्या पारंगत आहे. हार्दिक बॅटिंगसह बॉलिंगदेखील उत्तम पद्धतीने करतो. पांड्याची कामगिरी दिवसेंदिवस चांगली होत आहे. मुंबईच्या फ्रॅंचायझीने कायम ठेवलेल्या खेळाडूंपैकी हार्दिक पांड्या हा एक खेळाडू आहे. एखादी फ्रेंचायजी खेळाडूला कायम ठेवते यावरुन त्याच्या कामगिरीचा आवका येतो.
यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याचा खेळ चांगलाच वधरला आहे. पण हार्दिक पांड्याच्या खेळाला इरफान पठाणने ७ वर्षांआधीच ओळखले होते. पांड्याला हैदराबाद टीममध्ये समाविष्ट करावे, असा सल्ला इरफान पठाणने व्हीव्हीएस लक्ष्मनला दिला होता. या विधानाचा उल्लेख इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सच्या 'क्रिकेट लाईव्ह शो' दरम्यान केला. भविष्यात हार्दिक पांड्या एक उत्कृष्ठ खेळाडू म्हणून उभारीस येईल हे इरफानने तेव्हाच हेरले होते.
Bhai Ne Bola To Sunne Ka @IrfanPathan Superb Intuition pic.twitter.com/6akP1dcM1x
— Irfan Pathan’s “Fan Club” (@AllrounderIrfy) April 19, 2019
इरफान पठाण आणि लक्ष्मन हे दोघे क्रिकेट शोसाठी विश्लेषक म्हणून उपस्थित होते. पठाणने त्यावेळी म्हणजेच २०१३ ला पांड्याला हैदराबाद टीममध्ये घेण्याचा सल्ला मी मानायला हवा होता. तो मी न एकून चूक केली असे लक्ष्मनने इरफानच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला. तू इरफानने हार्दिक बदद्ल दिलेला सल्ला का मान्य केला नाहीस ? या प्रश्नावर उत्तर देताना लक्ष्मन म्हणाला की 'मी ते सांगू शकत नाही. इरफानने केवळ हार्दिकलाच नाही तर दीपक हुड्डाला टीममध्ये घेण्याचा सल्ला दिला होता'. हार्दिक सध्या घडीला मुंबईच्या विजयात मोठा वाटा उचलत आहे.
माझा सल्ला मानला असता तर आज मुंबईकडून खेळत असलेला हार्दिक कोणत्या दुसऱ्या टीमकड़ून खेळत असता, असे देखील इरफान पठाण म्हणाला.
हार्दिकने आतापर्यंत आयपीएलचे ६० मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये हार्दिकने ९०७ रन केल्या आहेत. तर ३६ विकेट घेण्याची कामगिरी देखील केली आहे. पांड्याने यंदाच्या आयपीएलमध्ये १० मॅच खेळला आहे. या १० मॅचमध्ये खेळताना हार्दिकने १८९ च्या स्ट्राईक रेटने २४१ रन केल्या आहेत. यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ३७ रन ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे.