India vs Australia 3rd T20: टीम इंडियाने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

 T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना हैदराबादमध्ये खेळवला जात आहे.

Updated: Sep 25, 2022, 06:49 PM IST
 India vs Australia 3rd T20: टीम इंडियाने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन  title=

हैदराबाद : India vs Australia 3rd T20 भारत आणि ऑस्ट्रेलिया  (India vs Australia 3rd T20) यांच्यातील T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याचा टॉस कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला प्रथम बॅटींग करावी लागणार आहे. 

तिसर्‍या T20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing Eleven) बदल केला आहे. ऋषभ पंतच्या जागी भुवनेश्वरचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियानेही (australia) एक बदल केला आहे. जोश इंग्लिसचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे.

तीन टी20 मालिकेत पहिला सामना ऑस्ट्रेलियाने (australia) जिंकला होता. तर दुसरा T20 यजमान टीम इंडियाने जिंकला होता. या विजयाने दोघेही 1-1ने बरोबरी साधली आहे. आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका कोण खिशात घालतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

मालिका विजयाची संधी 
टीम इंडियाने (Team India)  शेवटची टी20 मालिका 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (australia) मायदेशात जिंकली होती. जर आज रोहित ब्रिगेडने कांगारूंना हरवले तर 9 वर्षांनंतर मायदेशात ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकतील.

भारताची प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन: अॅरॉन फिंच (क), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डॅनियल सॅम्स, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, जोश हेझलवुड.