IND vs ENG : केएल राहुल जायबंदी, विराटच्या तालमीतील 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये एन्ट्री!

Devdutt Padikkal In Test Team :  टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर केएल राहुल तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. तर त्याच्या जागी विराट कोहलीच्या तालमीत तयार झालेल्या देवदत्त पेडिकलला संघात सामील करण्यात आलंय.

सौरभ तळेकर | Updated: Feb 12, 2024, 09:19 PM IST
IND vs ENG : केएल राहुल जायबंदी, विराटच्या तालमीतील 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये एन्ट्री! title=
IND vs ENG, Devdutt Padikkal, KL Rahul ruled out

IND vs ENG, Devdutt Padikkal : भारत आणि इंग्लंड यांच्याच पाच कसोटी सामन्यांची मालिका (IND vs ENG Test series) खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने खेळवण्यात आले असून भारत आणि इंग्लंड मालिकेत 1-1 अशा बरोबरीत आहे. अशातच आता उर्वरित तीन टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडिया जाहीर झालीये. मात्र, टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul ruled out) तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याची माहिती बीसीसीआयने (BCCI) दिली आहे. तर त्याच्या जागी विराट कोहलीच्या तालमीत तयार झालेल्या देवदत्त पेडिकलला (Devdutt Padikkal) संघात सामील करण्यात आलं आहे. रणजीमध्ये शतक ठोकल्यानंतर सिलेक्टर्सने त्याच्यावर विश्वास दाखवलाय.

कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यातील सामन्यात देवदत्त पेडिकल (Devdutt Padikkal) याने रणजी सामन्यात खणखणीत शतक ठोकलं आहे. पेडिकलने 218 बॉलमध्ये 151 धावांची खेळी केली. त्यात त्याने 8 सिक्स अन् 12 फोर खेचले. त्याच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकला 366 धावांची आघाडी मिळवता आली होती. त्यामुळे देवदत्त पेडिकलला पुन्हा टीम इंडियामध्ये पुन्हा संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती.

Ranji Trophy 2024 : किंग कोहलीच्या चेल्याचा वादळी धमाका, रणजी ट्रॉफीमध्ये ठोकलं शतक, नुसतंच 6,6,6,4,6,4,6,6...

सरफराज खानला संधी मिळणार?

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात युवा फलंदाज सरफराज खानला संधी मिळू शकते. शेवटच्या सामन्यातही त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली गेली नव्हती. राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 26 वर्षीय फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

भारत Vs इंग्लंड कसोटी वेळापत्रक -

तिसरी कसोटी सामना : 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी सामना : 23-27 फेब्रुवारी, रांची 
पाचवी कसोटी सामना : 7-11 मार्च, धरमशाला