IND vs ENG Semi-Final : वर्ल्डकप संपल्यानंतर Rohit sharma घेणार निवृत्ती?

इंग्लंडने (england) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तर या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) पुन्हा एकदा फ्लॉप ठरलाय. 

Updated: Nov 10, 2022, 03:44 PM IST
IND vs ENG Semi-Final : वर्ल्डकप संपल्यानंतर Rohit sharma घेणार निवृत्ती? title=

IND vs ENG Semi-Final : भारत विरूद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलचा (IND vs ENG Semi-Final ) थरार सध्या एडिलेडच्या मैदानावर रंगलाय. या सामन्यात टीम इंडियाने (Team india) इंग्लंडला 169 रन्सचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने (england) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तर या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) पुन्हा एकदा फ्लॉप ठरलाय. रोहितने अवघ्या 27 रन्सची खेळी केली. या खेळीमुळे रोहितला सोशल मीडियावर (social media) पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येतंय.

रोहित शर्माने सेमीफायनलच्या सामन्यात 28 बॉल्समध्ये 27 रन्सची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट अवघा 96.43 इतका आहे. यामुळे रोहित आणि टीम इंडियाचे फॅन्स नाराज असून त्यांनी रोहितला ट्रोल केलंय. 

रोहितच्या या हळू खेळीचा परिणाम टीम इंडियाच्या इतर फलंदाजीवरही दिसून आला. सेमीफायनलच्या सामन्यात संघाला वेगवान सुरुवातीची आवश्यकता होती. त्यामुळे कर्णधारापेक्षा सोशल मीडियावरील चाहते जास्तच निराश झाले. यामुळे हिटमॅनला प्रचंड ट्रोल करण्यासोबतच त्याच्यावर टीकाही करण्यात येतेय. यावेळी चाहत्यांनी त्याला आता निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.

सेमीफायनलमध्ये विराट-पंड्याची तुफान फलंदाजी

दुसऱ्या सेमी फायनलचा टॉस इंग्लंडचा (England) कर्णधार जोस (Jos Buttler) जिंकला आहे. इंग्लंडने प्रथम फिल्डींग करत टीम इंडियाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. इंग्लंडने प्रथम फिल्डींग करत टीम इंडियाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 168 रन्स केले. इंग्लंडला जिंकण्यासाठी 169 रन्सची आवश्यकता आहे. 

आजच्या सामन्यात पुन्हा एकदा किंग विराट कोहलीची बॅट तळपळी. या सामन्यात विराटने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली. तर हार्दिक पांड्यानेही त्याला यावेळी साथ दिली.

हार्दिक पंड्याची कमाल

हार्दिक पांड्याने सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियासाठी आश्चर्यकारक कामगिरी केलीये. टीम इंडिया अडचणीत असताना हार्दिकने तुफान फलंदाजी करत अवघ्या 33 बॉलमध्ये 63 रन्स केले. यादरम्यान हार्दिक पांड्याने 4 फोर आणि 5 सिक्स मारले. हार्दिकची खेळी नसती तर कदाचित टीमला खूप संघर्ष करावा लागला असता.