मुंबई : Ind vs Nz T 20 Series 2021: न्यूझीलंड विरुद्ध 3 टी-20 सामन्यांचा पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 मध्ये प्रथमच पूर्णवेळ कर्णधार आहे. त्याचा भारतासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल. या सामन्यात रोहित शर्माला संघ निवडीबाबत कोणतीही चूक करायला आवडणार नाही, त्यामुळे संघात बदल होणे निश्चित मानले जात आहे.
टीम इंडियाने अद्याप प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलेली नाही, मात्र अनेक खेळाडू संघात सहभागी होतील, असे मानले जात आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) भारताच्या सलामीची जबाबदारी घेऊ शकतात. या दोन्ही धोकादायक फलंदाजांनी सलामी करताना संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. हे फलंदाज जेव्हा फॉर्मात असतात तेव्हा ते कधीही सामन्याचे पारडे फिरवू शकतात.
भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohali) याला टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत तिसऱ्या क्रमांकासाठी अनेक दावेदार रिंगणात आहेत. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी तिसऱ्या क्रमांकावर अनेकवेळा स्फोटक खेळी खेळल्या आहेत. इशान किशन हाही तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी सज्ज आहे.
या संघात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक तरुणांना संधी देण्यात आली आहे. चौथ्या क्रमांकावर आपण ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) फलंदाजी करु शकतो. पाचव्या क्रमांकावरील यष्टिरक्षक फलंदाजासाठी ऋषभ पंत (Rishabh Pant) याचे स्थान निश्चित झाले आहे. गेल्या काही काळापासून त्याने ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे, तो टीम इंडियाचा नंबर वन यष्टिरक्षक आहे. वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याचे सहाव्या क्रमांकाचे स्थान निश्चित झाले असून, हार्दिक पांड्याच्या जागी त्याची संघात निवड करण्यात आली आहे. अय्यरने केकेआरचा फायनलपर्यंतचा प्रवास एकट्य़ाच्या बळावर केला होता. हा डावखुरा फलंदाज अत्यंत सध्या फॉर्ममध्ये आहे.
अष्टपैलू म्हणून अक्षर पटेल (Axar Patel) याला संधी दिली जाऊ शकते. पटेल हा चेंडू आणि बॅटने चमत्कार दाखवण्यात कुशल खेळाडू आहे. मैदानावर पाहून त्याची चपळता निर्माण होते. क्षेत्ररक्षणात तो बॉल विकेटवर असा मारतो की जणू एखादा नेमबाज त्याच्या टार्गेटला मारतोय. टीम इंडियासाठी तो तिन्ही विभागात चांगली कामगिरी करू शकतो.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे हर्षल पटेल (Harshal Patel) आणि आवेश खान (Avesh Khan) हे खास वेगवान गोलंदाज म्हणून संघात राहतील. फिरकीपटूंबद्दल बोलायचे झाल्यास, रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हे अनुभवी गोलंदाज फिरकीची धुरा सांभाळतील. अश्विनला छोट्या फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करून आपले स्थान पक्के करायचे आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याचा फॉर्म गेला आहे. त्याच्या गोलंदाजीतील जादू संपली आहे. भुवनेश्वर चांगलाच महागडा ठरला आहे. टी-20 विश्वचषकातील त्याची कामगिरीही अत्यंत मध्यम स्वरूपाची होती. अशा परिस्थितीत या खेळाडूला संधी देणे रोहित शर्मा याला आवडणार नाही.