IND vs PAK : "...पाकिस्तानच विजयासाठी लायक होता, टीम इंडियाच्या खेळाडूचं वक्तव्य

Asia Cup 2022 : टीम इंडियाला (Team India) सुपर 4  फेरीतील पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला

Updated: Sep 6, 2022, 10:41 PM IST
IND vs PAK : "...पाकिस्तानच विजयासाठी लायक होता, टीम इंडियाच्या खेळाडूचं वक्तव्य title=

मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कप-2022 मध्ये (Asia Cup 2022) खेळत आहे. टीम इंडियाची (Team India) आशिया कपमधील कामगिरी निराशाजनक राहिली. टीम इंडियाने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकून सुपर-4 फेरीत धडक मारली.  मात्र, या फेरीतील पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानच्या या विजयाबाबत टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर अश्विनने (R Ashwin) मत मांडलंय. (ind vs pak asia cup 2022 team india spinner r ashwin on pakistan match win)

"भारत-पाकिस्तान सामना हा कायम हायव्होल्टेज आणि दबावयुक्त असतो. मी ते बाहेरून पाहिलं, मी म्हणू शकतो की पाकिस्तानने चांगला खेळ केला आणि टीम जिंकण्यास पात्र होती. आमच्यासाठीही तो चांगला सामना होता. आपण कुठे चूक केली हे आपल्यावर अवलंबून आहे, त्यातून शिकून पुढे जा", असं अश्विन म्हणाला. 

“टीम इंडियाकडून खेळण्यासाठी संधीची वाट पाहावी लागते. निकालाची कोणतीही शाश्वती नाही. मला सर्वोत्तम तयारी करायची आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करतो. जगातील अनेक संघांना T20 वर्ल्ड कपपूर्वी अशी स्पर्धा (आशिया कप) खेळण्याची संधी मिळत नाही", असंही अश्विनने नमूद केलं.