T20 World Cup पूर्वी टीम इंडियाच टेन्शन वाढलं, आता 'हा' खेळाडू जखमी

टीम इंडियाचा सर्वांत अनुभवी बॉलर जखमी, T20 वर्ल्डकपआधी चिंता वाढली 

Updated: Sep 29, 2022, 02:29 PM IST
T20 World Cup पूर्वी टीम इंडियाच टेन्शन वाढलं, आता 'हा' खेळाडू जखमी title=

तिरुवनंतपुरम : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध  (Ind vs SA t20i) तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आपला संघ जाहीर केला. हा संघ जाहीर होताच टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू जखमी झाला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप पूर्वी टीम इंडियासाठी ही चिंताजनक बातमी आहे.  

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी20 (Ind vs SA t20i)  सामन्यात टीम इंडियाचा (Team India) संघ जाहीर होताच फॅन्सला मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा स्टार खेळाडूला संघात स्थान मिळालं नव्हत. याबाबत रोहित शर्माला मैदानावर विचारण्यात आल्यानंतर त्याने देखील चिंता व्यक्त केली. यानंतर बीसीसीआयने (BCCI) देखील या खेळाडूवर स्पष्टीकरण दिले आहे. नेमका हा खेळाडू कोण आहे, ते जाणून घेऊयात.  

 

T20 World Cup आधी जसप्रीत बुमराहला गंभीर दुखापत, 'या' तीन खेळाडूंना मिळणार संधी 

 

'हा' आहे खेळाडू?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (jasprit bumrah) पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा टॉसच्या वेळेस बुमराह बाबत म्हणाला की, जसप्रीत बुमराहला काही समस्या आहे, त्यामुळे तो हा सामना खेळू शकणार नाही.

बीसीसीआय काय म्हणाले? 
बीसीसीआयकडून (BCCI) जसप्रीत बुमराहबाबत  (jasprit bumrah) एक महत्त्वपूर्ण अपडेटही देण्यात आले. जसप्रीत बुमराहच्या पाठीत दुखत आहे, त्यामुळे तो पहिला T20 सामना खेळू शकला नाही, असे ट्विट बीसीसीआयने केले आहे. जसप्रीत बुमराहला मंगळवारी सरावात पाठदुखी झाली होती, त्यामुळे त्याची प्लेइंग-11 मध्ये निवड झाली नसल्याची माहिती आहे.  

नुकताच दुखापतीतून सावरला 
दरम्यान जसप्रीत बुमराह  (jasprit bumrah) काही दिवसांपुर्वीच टीम इंडियामध्ये परतला होता, त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत दोन सामने खेळले होते. मात्र या दोन सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहची फारशी चांगली कामगिरी नव्हती. त्यात आता पुन्हा एकदा त्याला दुखापत झाल्याने टीम इंडियाची चिंता वाढलीय.  

दरम्यान याआधी टी20 वर्ल्डकपपुर्वी रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी,  हार्दीक पंड्या हे खेळाडू दुखापतीमुळे संघा बाहेर होते. त्यात आता जसप्रीत बुमराहलाही  (jasprit bumrah) दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. तसेच हे खेळाडू लवकर बरे व्हावे अशी अपेक्षा केली जात आहे.