Cheteshwar Pujara | शून्यावर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये द्रविडने पुजारासोबत काय केलं?

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील (IND vs SA 1st Test) पहिल्या दिवशी दमदार कामगिरी केली. 

Updated: Dec 27, 2021, 04:57 PM IST
Cheteshwar Pujara | शून्यावर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये द्रविडने पुजारासोबत काय केलं?   title=

सेंचुरियन : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील (IND vs SA 1st Test) पहिल्या दिवशी दमदार कामगिरी केली. टीम इंडियाच्या सलामीवीर केएल राहुलने (K L Rahul) खणखणीत शतक ठोकलं. मयांक अग्रवाल  60 धावा करुन माघारी परतला. मात्र टीम इंडियाचा तारणहार असलेल्या चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) या दौऱ्याची सुरुवात ही निराशाजनक झाली. (Ind vs sa test series india vs south africa 1st test day 1 head coach rahul dravid reaction viral after cheteshwar pujara out on golden duck at Centurion) 
  
पुजारा पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. लुंगी एन्गिडीच्या पहिल्या चेंडूवर पुजाराने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात कट लागून बॉल शॉर्ट लेगवर असलेल्या किगन पीटरसनकडे गेला. 

पुजारा अशा प्रकारे गोल्डन डक झाला. पहिल्याच चेंडूवर बाद होण्याच्या प्रकाराला क्रिकेटमध्ये गोल्डन डक असं म्हंटलं जातं. 

पुजारा निराश होऊन ड्रेसिंग रुममध्ये पोहचला. यानंतर काही मिनिटांनी हेड कोच राहुल द्रविडने जे काही केलं, ते सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल होतंय.    

द्रविडने नक्की काय केलं? 

पुजारा आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये पोहचला. कपडे बदलून बालकनीत आला. तितक्यात द्रविड बसल्या जागेवरुन उठला. पुजाराची पाठ थोपाटली. द्रविडच्या या कृतीने पुजारा भारावला. पुजाराला खुदकन हसला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पहिल्या दिवशी टीम इंडियाची दमदार बॅटिंग

पावसाच्या व्यत्ययामुळे अजूनही दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवलात झालेली नाही. दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार बॅटिंग केली. 

केएल राहुलची नाबाद 122 धावा, मयंक अग्रवालची अर्धशतकी खेळी आणि रहाणेच्या नॉट आऊट 40 रन्सच्या जोरावर टीम इंडियावर पहिल्या दिवसखेर 90 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 272 धावा केल्या.

राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा