IND vs SL 2nd Test | श्रेयसनंतर बुमराह आणि शमीचा धमाका, पहिला दिवस भारताच्या नावे

श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवसाचा (IND vs SL 2nd Test) खेळ संपला आहे. पहिला दिवस टीम इंडियाच्या (Team India) नावावर राहिला आहे.

Updated: Mar 12, 2022, 10:12 PM IST
IND vs SL 2nd Test | श्रेयसनंतर बुमराह आणि शमीचा धमाका, पहिला दिवस भारताच्या नावे title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

मुंबई : श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवसाचा (IND vs SL 2nd Test) खेळ संपला आहे. पहिला दिवस टीम इंडियाच्या (Team India) नावावर राहिला आहे. 252 धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना बाद केलं आहे. श्रीलंकेने पहिल्या दिवशी 30 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 86 धावा केल्या. श्रीलंका अजून 166 धावांनी पिछाडीवर आहे. (ind vs sl 2nd day night pink bowl test day 1 stumps sri lanka lost 6 wickets after team india all out 252 runs at m chinnaswamy stadium bengaluru)

श्रीलंकेला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून धक्के द्यायला सुरुवात केली. बुमराहने लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर लंकने एकामागोमाग एक 6 असे विकेट्स गमावले.

लंकेकडून एंजलो मॅथ्यूजने सर्वाधिक 43 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही.  

टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीने 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेत बुमराहला चांगली साथ दिली. 

दरम्यान त्याआधी टीम इंडियाचा 59.1 ओव्हरमध्ये पहिला डाव 252 धावांवर आटोपला. निराशाजनक सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र या फलंदाजा या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. विराटने 23, हनुमाने 31 तर रिषभने 39 धावांचं योगदान दिलं. 

मात्र टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर श्रेयस अय्यर मैदानात घट्ट पाय रोवून उभा राहिला. अक्षरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित सोबत मिळाली नाही. 

टीम इंडियाने अय्यरच्या रुपात 10 वी विकेट गमावली. अय्यरने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 10 फोर आणि 4 सिक्स खेचले.  

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह. 

श्रीलंका प्लेइंग XI | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो आणि प्रवीण जयविक्रमा.