Washington Sundar replaces Axar Patel: आज आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये एशिया कपचा फायनल सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी काही तास अगोदर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. यावेळी फायनल सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियामध्ये मोठा बदल केला आहे. अंतिम सामन्यापूर्वी एका स्टार खेळाडूला टीममध्ये एन्ट्री दिलीये.
एशिया कप फायनलपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आलाय. टीम इंडियाला खेळाडू अक्षर पटेल दुखापतीमुळे या स्पर्धेच्या फायनला मुकला आहे. यावेळी अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. या महत्त्वाच्या सामन्यासाठी 23 वर्षीय वॉशिंग्टन सुंदरचा समावेश कऱण्यात आला असून तो श्रीलंकेत पोहोचलाय.
यासंदर्भातील घोषणा बीसीसीआयने रात्री उशीरा केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रेस रिलीज जाहीर केलं. यावेळी या प्रेस रिलीजमध्ये 'शुक्रवारी बांगलादेश विरुद्ध भारताच्या सुपर फोर सामन्यात अक्षर पटेलला दुखापत झाली. दरम्यान त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या आशिया कप फायनलमधून बाहेर पडलाय. निवड समितीने वॉशिंग्टन सुंदरची बदली म्हणून निवड केलीये आहे. शनिवारी संध्याकाळी तो कोलंबोला पोहोचला असून टीममध्ये सामील झालाय.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
गेल्या 5 वर्षांपासून टीम इंडियाने कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. 2018 मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शेवटचं विजेतेपद पटकावलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुबईच एशिया कपमध्ये बांगलादेशचा तीन विकेट्स राखून पराभव केला होता.
यानंतर भारताने 2019 वनडे वर्ल्डकप आणि 2022 टी-20 वर्ल्डकपमध्ये स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. 2019 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये न्यूझीलंडकडून आणि 2023 WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरले. गेल्या वर्षीच्या एशिया कपमध्येही टीम इंडियाला साजेशी कामगिरी करता आली नाही.