मुंबई : आज टीम इंडिया विरूद्ध श्रीलंका यांच्यात पहिला टेस्ट सामना मोहालीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना विराट कोहलीसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण हा त्याचा 100 वा टेस्ट सामना आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माने टेस्ट टीमचं कर्णधारपद स्विकारलं असून आज तो मैदानात उतरणार आहे. टी-20 नंतर टेस्ट जिंकण्याकडेही रोहितचा कल आहे. पाहूया कशी असेल आजची प्लेईंग 11.
या टेस्टमध्ये टीमच्या मीडल ऑर्डरमध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांची अनुपस्थिती मोठा विषय आहे. रहाणे आणि पुजाराला यांच्या जागी शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांना संधी मिळेल. या तिघांनी कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या खेळाची झलक दाखवलीये.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी कर्णधार रोहितशिवाय आणखी ओपनर आहेत. यामध्ये मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल यांचा समावेश आहे. मात्र, पहिल्या कसोटीत मयंक अग्रवाल रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची शक्यता अधिक आहे. यानंतर शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.
विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा मिडल ऑर्डरमध्ये खेळणार आहेत. टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनसोबत गोलंदाज सौरभ कुमारला संधी मिळण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह असतील.
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल/हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.