Team India | टीम इंडियाचा स्टार बॅट्समन, ज्यामुळे कॅप्टन रोहितला रहाणे-पुजाराचा विसर पडेल

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanak Test Series 2022) यांच्यात शुक्रवार 4 मार्चपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होतेय.   

Updated: Mar 3, 2022, 06:01 PM IST
Team India | टीम इंडियाचा स्टार बॅट्समन, ज्यामुळे कॅप्टन रोहितला रहाणे-पुजाराचा विसर पडेल title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanak Test Series 2022) यांच्यात शुक्रवार 4 मार्चपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होतेय. या मालिकेपासून रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या टेस्ट कॅप्टन्सीचा श्रीगणेशा करणार आहे. टीम इंडियाच्या गोटात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत, जे टीमला एकहाती सामना जिंकवू शकतात. मात्र एक बॅट्समन असाही आहे, जो मैदानात एक बाजू लावून धरतो. हाच 22 वर्षांचा खेळाडू रोहितसाठी अस्त्र ठरु शकतो. (ind vs sl test series 2022 team india captain rohit sharma might wil give chance to 22 years star opener batsman shubamn gill in 1st test) 

या मालिकेतून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर (One Down) शुबमन गिलला (Shubaman Gill) संधी मिळू शकते.

शुबमनकडे विराट कोहलीचा क्रिकेटमधील वारसदार म्हणून पाहिलं जातं. शुबमनच्या भात्यात अनेक शॉटचा समावेश आहे. शुबमनने आतापर्यंत अनेक गोलंदाजांना बॅटिंगने चोप दिला आहे.

शुबमन श्रीलंका विरुद्ध धमाकेदार कामगिरी करु शकतो. शुबमनने अवघ्या काही महिन्यांमध्येच टीम इंडियामध्ये आपलं स्थान कायम केलं आहे. गिलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही निर्णायक क्षणी दमदार कामगिरी केली होती.

शुबमनने आतापर्यंत 10 कसोटींमध्ये 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. शुबमन आता विराटनंतर रोहितच्या कॅप्टन्सीत चमकू शकतो. शुबमनचा इंग्लंड दौऱ्यात समावेश नव्हता. 

तर डिसेंबरमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत रोहितचा समावेश नव्हता. यानंतर हे दोघे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही खेळले नव्हते. त्यामुळे शुबमनला श्रीलंका विरुद्धच्या सीरिजमध्ये संधी मिळाली, तर रोहित-शुबमन ही सलामी जोडी पुन्हा एकत्र खेळताना दिसेल.   
 
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.