चेल्मसफोर्ड : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारताच्या तीन दिवसांच्या सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. या मॅचच्या सुरुवातीलाच भारताला धक्के बसले आहेत. शिखर धवन शून्य रनवर आऊट झाला आहे. तर चेतेश्वर पुजारालाही फारशी चमक दाखवता आलेली नाही. अजिंक्य रहाणे ४७ बॉलमध्ये १७ रन बनवून आऊट झाला.
याआधी इसेक्ससोबत होणारी ही मॅच ४ दिवसांची होणार होती पण भारतीय टीम व्यवस्थापनानं विनंती केल्यानंतर हा सामना ३ दिवसांचा करण्यात आला. इंग्लंडमधल्या गरमीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय. इंग्लंडमध्ये सध्या ३० डिग्री एवढं तापमान आहे.
सध्याची भारतीय टीम तक्रार करण्यात विश्वास ठेवत नाही, असं वक्तव्य मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केलं. सराव सामन्यासाठीच्या मॅचच्या खेळपट्टीवर गवत आहे आणि मैदान खेळण्यासाठी अनुकूल नसल्यामुळे भारतानं ४ दिवसांचा सामना ३ दिवसांचा केला, असा आरोप करण्यात येत होता पण शास्त्रीनं हे सगळे आरोप फेटाळून लावले. १ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.