Axar Patel | फिरकीसमोर न्यूझीलंडला गिरकी, अक्षर पटेलचा फाईव्ह स्टार 'पंच'

 टीम  इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील तिसरा दिवस हा टीम इंडियाच्या नावावर राहिला.   

Updated: Nov 27, 2021, 06:40 PM IST
Axar Patel | फिरकीसमोर न्यूझीलंडला गिरकी, अक्षर पटेलचा फाईव्ह स्टार 'पंच'

कानपूर | टीम  इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand 1st Test) यांच्यातील पहिल्या कसोटीतील तिसरा दिवस हा टीम इंडियाच्या नावावर राहिला. टीम इंडियाने न्यूझीलंडला पहिल्या डावात 296 धावांवर ऑल आऊट केलं. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने (Axar Patel) सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. (india vs new zealand 1st test day 3 axar patel take 5 wickets at green park kanpur)
 
अक्षरने कसोटी कारकिर्दीत 5 विकेट घेण्याची ही पाचवी वेळ आहे. अक्षर हा कसोटीतील पहिल्या 4 सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा  5 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नरेंद्र हिरवाणी आहे. हिरवाणी यांनी टेस्ट करियरमधील पहिल्या 4 सामन्यांमध्ये 3 वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या.  अक्षर भारतात एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेणारा पहिला डावखुरा फिरकीपटू ठरला.

सर्वात कमी डावात 5 विकेट्स घेण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज रोडनी हॉग याने 6 डावात केला होता. दुसऱ्या क्रमांकावर चार्ली टर्नर, टॉम रिचर्डसन आणि अक्षर पटेल हे तिघेही संयुक्तरित्या आहेत. या तिघांनी 7 डावांमध्ये हा कारनामा केला आहे. 

कसोटीत सलग 4+ विकेट्स घेणारे गोलंदाज 

कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा सलग 4+ विकेट्स घेण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथ्य्या मुरलीथरन आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वकार युनिस आहे. या दोघांनी सलग 9 वेळा 4+ विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. चार्ली टर्नरने 8 वेळा अशी कामगिरी केली आहे. तर यानंतर जॉनी ब्रिग्स आणि अक्षर पटेलने संयुक्तरित्या 6 वेळा ही कामगिरी केली आहे. 

टीम इंडियाकडे 49 धावांची आघाडी

दरम्यान टीम इंडियाला दुसऱ्या डावात 49 धावांची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 14 धावा केल्या आहेत. त्यामुळे चौथ्या दिवशी टीम इंडिया न्यूझीलंडसमोर  किती धावांचे आव्हान ठेवणार, याकडे लक्ष असणार आहे.