भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Sep 25, 2017, 04:01 PM IST
भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा

क्राईस्टचर्च : भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या या दौऱ्यासाठी न्यूझीलंडनं ९ खेळाडूंची घोषणा केली आहे तर अन्य ५ खेळाडूंचा निर्णय लवकरच होणार आहे. उरलेल्या पाच खेळाडूंचा समावेश सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड अ टीममधून होणार आहे.

या टीममध्ये जेम्स नीशम आणि नील ब्रूम यांना जागा मिळालेली नाही. याबाबत नीशम आणि ब्रूम यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. तसंच त्यांना खेळामध्ये सुधारणा करायला सांगितल्याचं प्रशिक्षक माईक हसन यांनी सांगितलंय.

न्यूझीलंडविरुद्धची पहिली वनडे २२ ऑक्टोबरला मुंबईत खेळवली जाणार आहे. या सीरिजनंतर दोन्ही टीममध्ये टी-20 सीरिज होणार आहे. न्यूझीलंडची टीम १२ ऑक्टोबरला भारतात जाण्यासाठी रवाना होईल.

न्यूझीलंडची टीम : केन विलियमसन (कॅप्टन), ट्रेन्ट बोल्ट, कोलीन डी ग्रँडहोम, मार्टिन गुप्टिल, टॉम लिथम, अॅडम मिलने, मिचेल सँटनर, टीम साऊदी, रॉस टेलर

न्यूझीलंडसोबत ३ वन डे आणि ३ टी -२०

१७ ऑक्टोबर - पहिला सराव सामना - सीसीआय, मुंबई

१९ ऑक्टोबर - दुसरा सराव सामना - सीसीआय, मुंबई

२२ ऑक्टोबर - पहिली वन डे, मुंबई, दुपारी १.३० वाजता

२५ ऑक्टोबर - दुसरी वन डे, पुणे, दुपारी १.३० वाजता

२९ ऑक्टोबर - तिसरी वन डे, (यूपीसीए ), दुपारी १.३० वाजता

टी - २०

१ नोव्हेंबर - पहिला टी २० - नवी दिल्ली, सायंकाळी ७ वाजता

४ नोव्हेंबर - दुसरा टी -२०, राजकोट, , सायंकाळी ७ वाजता

७ नोव्हेंबर - तिसरा टी-२०, तिरुवनंतपुरम, सायंकाळी ७ वाजता