भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा आणि निर्णायक वनडे सामना रंगणार आहे. पहिल्या वनडेत पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या वनडेत दमदार यश मिळवले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Oct 29, 2017, 08:54 AM IST
भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज title=

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा आणि निर्णायक वनडे सामना रंगणार आहे. पहिल्या वनडेत पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या वनडेत दमदार यश मिळवले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. 

कानपूरचे ग्रीनपार्क स्टेडियम भारतासाठी लकी असल्याने या मैदानावर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. विराट कोहली आणि कंपनीने यासाठी जोरदार तयारीही केलीये. 

दुसऱ्या वनडेत भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर फलंदाजांनीही त्यांना चांगली साथ दिली. तिसऱ्या सामन्यातही क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाकडून हीच अपेक्षा आहे. 

दुसरीकडे न्यूझीलंडचा संघही काही कमी नाहीये हे त्यांनी पहिल्या सामन्यात दाखवून दिलेय. त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक भारत तिसऱ्या सामन्यात करणार नाही. 

टीम, भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर.

न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कोलिन डि ग्रांडहोमे, मार्टिन गप्टिल, मॅट हॅनरी, टाम लाथम, हेन्री निकोल्स, अॅडम मिल्ने, कोलिन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टिम साऊदी, रॉस टेलर, जार्ज वर्कर आणि ईश सोढी.

सामन्याची वेळ : दुपारी दीड वाजता.