IND vs PAK Asia Cup 2022: टीम इंडियाच्या (Team India) मिशन 'एशिया कप 2022' आजपासून सुरुवात होतेय. भारतीय संघाचा पहिलाच सामना आहे तो पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India vs Pakistan). या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ सज्ज झालाय. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशानेच भारतीय टीम मैदानात उतरेल.
पण या एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला तीन गोष्टींचं टेन्शन सतावतंय. या तीन गोष्टी एशिया कप स्पर्धेत भारतीय टीमची सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकतात.
टीम इंडियाची ओपनिंग जोडी किती फिट
गेल्या काही सामन्यात भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीत सातत्याने बदल केले जात आहेत. एशिया कप स्पर्धेत सलामीला रोहित शर्माबरोबर के एल राहुल (KL Rahul) मैदानात उतरेल. पण केएल राहुल दुखापतीनंतर मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर भारतीय संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
विराट कोहली फॉर्मात येणं गरजेचं
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मोठ्या ब्रकेनंतर मैदानात उतरणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंड दौऱ्यानंतर विराट आता थेट एशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. गेल्या काही सामन्यात विराट धावांसाठी झगडताना दिसतोय. अशात एशिया कप स्पर्धेतल्या त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल. विराट पुन्हा फॉर्मात येणं गरजेचं आहे अन्यथा त्याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो.
या प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती जाणवेल
एशिया कप स्पर्धेआधीच भारतीय संघाला बसलेला सर्वात मोठा फटका म्हणजे प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि हर्षल पटेलची (Harshal Patel) दुखापत. दुखापतीमुळे हे दोनही वेगवान गोलंदाज स्पर्धेतून आऊट झाले आहेत. जसप्रीत बुमराह भारतीय संघासाठी सर्वात मोठा मॅच विनर म्हणून ठरला आहे.
जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची प्रमुख मदार असणार आहे ती वेगावन गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर (Bhuvneshwar Kumar). त्याला साथ मिळेल ती नवख्या अर्शदीप सिंह आणि आवेश खानची.