भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना आज रंगणार, पावसाचे सावट

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला टी-२० सामना रंगणार आहे. 

Updated: Sep 15, 2019, 10:20 AM IST
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना आज रंगणार, पावसाचे सावट title=
संग्रहित छाया

धरमशाला : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज धरमशाला इथे पहिला टी-२० सामना रंगणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाने जोरादर सराव केला आहे. नुकत्याच वेस्टइंडिजविरूद्ध झालेल्या टी-२० मालिकेत भारताने विंडीजचा ३-० धुव्वा उडवला होता. तोच विजयी धडाका कायम ठेवण्याचा निर्धार टीम इंडियाने केला आहे. भारत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ३ टी-२० सामने खेळणार आहेत. पावसाची शक्यता असल्याने हा सामना होणार की नाही, याची चिंता आहे.

दरम्यान, सामन्यावर पावसाचे सावट आहे. हिमाचल प्रदेश येथे पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याला पावसाचा फटका बसू शकतो. हवामान विभागाने पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

टी -२० मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३ पैकी ८ सामने जिंकले आहेत. दरम्यान, टीम इंडियाच्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विराटला टी-२०मध्ये सर्वाधिक धावा करण्याची संधी असून तो अव्वल स्थानावर पोहोचू शकतो. तर रोहित हा ५३ धावांच्या आघाडीसह अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे रोहित आणि विराटमध्ये जोरदार चूरस आहे.