मोहाली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान आज दुसरा टी-२० सामना खेळला जाणार आहे. मोहालीत आज संध्याकाळी ७ वाजता हा सामना रंगेल. ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतला पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. या सामन्यातून भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक नवा विक्रम खुणावत आहे. टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा स्वतःच्या नावावर करण्याची संधी, या सामन्यात विराट कोहली मिळवू शकतो.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक टी-२० रन आहेत. रोहितने ९६ टी-२० मॅचमध्ये २४२२ रन केले आहेत. तर विराटने ७० मॅचमध्येच २३६९ कन केले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ४ शतकं केली आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये विराटच्या नावावर सर्वाधिक २१ अर्धशतकं आहेत.
टीम इंडिया भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही मॅच जिंकली नाही. त्यामुळे मोहालीच्या सामन्यात हे रेकॉर्ड पुसून टाकण्याचा प्रयत्न विराट आणि त्याची टीम करेल. मोहालीमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत २ टी-२० मॅच खेळल्या आहेत. यातल्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. भारताने या मैदानात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे.
दक्षिण आफ्रिका याआधी भारतात २०१५ साली ३ टी-२० मॅचची सीरिज खेळली होती. यामध्ये टीम इंडियाचा ०-२ने पराभव झाला होता. त्या सीरिजमधलीही एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती.
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, नवदीप सैनी, केएल राहुल, मनिष पांडे, राहुल चहर, खलील अहमद
क्विंटन डिकॉक, रिझा हेन्ड्रीक्स, रसी व्हॅनडर डुसेन, टेम्बा बऊमा, डेव्हिड मिलर, एन्डिले पेहलुक्वायो, ड्वॅन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, ब्युरन हेन्ड्रीक्स, ज्युनियर डाला, तबरेझ शम्सी, एनरिच नोर्टजे, जॉर्न फॉर्ट्युन, जॉर्ज लिन्डे