INDvsSL: टीम इंडियाच्या पराभवाची ५ कारणं

श्रीलंकेविरोधात टीम इंडियाचा पहिल्याच मॅचमध्ये पराभव झाला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला केवळ ११२ रन्स करता आले. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने ७ विकेट्स गमावत ही मॅच जिंकली.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 10, 2017, 08:05 PM IST
INDvsSL: टीम इंडियाच्या पराभवाची ५ कारणं title=
Image: IANS

नवी दिल्ली : श्रीलंकेविरोधात टीम इंडियाचा पहिल्याच मॅचमध्ये पराभव झाला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला केवळ ११२ रन्स करता आले. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने ७ विकेट्स गमावत ही मॅच जिंकली.

भारतीय टीमचा पराभव करत श्रीलंकन टीमने तीन मॅचेसच्या वन-डे सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. या पराभवाचे मुख्य ५ कारणं काय आहेत यावर एक नजर टाकूयात...

टॉस आणि मॅच:

धरमशाला वन-डे मॅचपूर्वीच सांगण्यात आलं होतं. जी टीम टॉस जिंकेल त्या टीमची जिंकण्याची शक्यता अधिक असेल. टॉस श्रीलंकेने जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकन बॉलर्सने टीम इंडियाला ११२ रन्सवर ऑल आऊट केलं.

सुरंगा लकमल एक वादळ:

श्रीलंकेचा फास्ट बॉलर सुरंगा लकमलने मॅचमध्ये आपली जबरदस्त कामगिरी दाखवून दिली आहे. कोलकाता टेस्ट मॅचमध्येही त्याने आपली एक झलक दाखवली होती. त्यानंतर धरमशाला वन-डेमध्ये लकमलने १० ओव्हर्सपैकी ४ ओव्हर्स मेडन टाकल्या. तर इतर ओव्हर्समध्ये १३ रन्स देत ४ विकेट्स घेतले.

बुमराहचा नो बॉल:

धरमशाला वन-डे मॅचमध्ये जसप्रीत बुमराहने पुन्हा तिच चूक केली जी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मॅचमध्ये केली होती. त्याने ज्या बॉलवर विकेट घेतला तो नो बॉल होता. त्याच प्रकारे या मॅचमध्येही ज्या बॉलवर थरंगाला आऊट केलं तो नो बॉल होता. थरंगाने या मॅचमध्ये ४९ रन्सची इनिंग खेळली.

अजिंक्य रहाणे टीममध्ये नाही:

या मॅचमध्ये अजिंक्य रहाणे खेळला नाही. भलेही श्रीलंकेविरोधात अजिंक्य रहाणेने चांगलं प्रदर्शन केलं नाहीये. मात्र, २०१४ साली रहाणेने धरमशाला येथे वेस्ट इंडिज विरोधात चांगली पार्टनरशीप केली होती. गेल्यावर्षी न्यूझीलंडविरोधातही खेळताना रहाणेने चांगला स्कोअर केला होता. त्यामुळे टीम इंडिया १६ ओव्हर्स शिल्लक ठेवत मॅच जिंकली होती.

टीम इंडियाची बॅटिंग:

धरमशालाच्या मैदानात टीम इंडियाचं प्रदर्शन इतकं खराब झालं की याचा कुणी विचारच केला नसेल. टीम इंडियाचे ४ बॅट्समन तर खातंही उघडू शकले नाहीत.